Vidhan Sabha Election: विधानसभा निवडणुकीत शरद पवार गटाचं ८५ जागांसाठी खास मिशन; काय असणार नेमकी राजकीय खेळी?

Vidhan Sabha Election Strategy: राज्यात लोकसभा निवडणुकांनंतर आता विधानसभेच्या निवडणुकांचे वारे वाहू लागले आहे. सर्व राजकीय पक्षांनी विधानसभेच्या कामाला सुरुवात केली आहे.
Vidhan Sabha Election
Vidhan Sabha ElectionSaam Tv
Published On

लोकसभेच्या निवडणुकांचा निकाल जाहीर झाला आहे. लोकसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकासाघाडीला चांगले यश मिळाले आहे. लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभेचे वारे वाहू लागले आहेत. सर्व पक्षांनी विधानसभा निवडणुकीसाठी कामाला सुरुवात केली आहे. लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटाने ८ जागा जिंकल्या आहेत. असाच विजय विधानसभा निवडणुकीत मिळवणार असल्याचे शरद पवार गटाकडून सांगण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर शरद पवार गटाने ८५ जागांसाठी खास मिशन आखलं आहे. (What Is Mission 85)

शरद पवार गटाने विधानसभा निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. विधानसभा निवडणुकीच त्यांनी राज्यात ८५ जागा जिंकण्याचे लक्ष ठेवले आहे. यासाठी आमदार रोहित पवार यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे. शरद पवार यांच्या ८५ वाढदिवस डिसेंबर महिन्यात साजरा केला जाणार आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त ८५ आमदार निवडून देण्याचा निर्धार केला आहे, असे रोहित पवारांनी (Rohit Pawar) सांगितले आहे.

मिशन ८५ म्हणजे नक्की काय?

काही आठवड्यांनी विधानसभेच्या निवडणुका (Vidhan Sabha Election) जाहीर होण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीत ८५ जागा जिंकण्याचा शरद पवार गटाने निर्धार केला आहे. त्यामुळेच त्यांनी मिशन ८५ लाँच केले आहे. महाराष्ट्रातील २८८ जागांपैकी ८५ जागां जिंकण्याचे शरद पवार गटाचे लक्ष आहे.

Vidhan Sabha Election
Manoj jarange Patil: खासदार बजरंग सोनवणे पुन्हा मनोज जरांगेंच्या भेटीला, २ तास चर्चा; सर्व खासदारांसोबत राज्यपालांची भेट घेणार

विधानसभा निवडणूक कधी होणार?

महाराष्ट्र राज्य विधानसभेचा कार्यकाळ २०२४ मध्ये संपणार आहे. पुढील विधानसभेची निवडणूक ऑक्टोबर २०२४ किंवा त्यापूर्वीच होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील एकूण २८८ जागांसाठी ही विधानसभा निवडणूक होणार आहे. भारतीय निवडणूक आयोगाने अद्याप याबाबत कोणतीही घोषणा केलेली नाही.

Vidhan Sabha Election
Maratha Reservation: मनोज जरांगेंच्या उपोषणावर तोडगा काढण्यासाठी हालचाली सुरु! सरकारचे शिष्टमंडळ आज अंतरवालीत जाणार

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com