

Nagpur Rain Update : नागपूरच्या अनेक भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. सकाळपासून कडाक्याच्या उन्हाने तापलेल्या जमिनीवर पावसाचे थेंब पडल्याने वातावरणात गारवा पसरला आहे. मात्र शेतकऱ्यांचे यात मोठे नुकसान झाले आहे. मुसळधार पावसाने सखोल भागात पाणी देखील साचले आहे. (Weather Report)
दिवसा जिवाची लाहीलाही रात्री मुसळधारा
विदर्भात आज दिवसभर उन्हाचा तडाखा कायम होता.
अकोला 40.5
अमरावती 41.4
बुलढाणा 37.4
चंद्रपूर 42.8
गडचिरोली 41.8
गोंदिया 41.5
नागपूर 39.8
वर्धा 41.4
यवतमाळ 41.2
नागपूरमध्ये देखील 39.8 एवढे तापमान दुपारी होते. दुपारी उकाडा आणि रात्री धोधो पाऊस असा प्रकार नागपूरमध्ये सध्या सुरू आहे. नागपूरमध्ये वादळवाऱ्यासह जोरदार अवकाळी पाऊस सुरू आहे. शहरातील काही सखोल भागात पाणी देखील साचले आहे.
जिल्ह्यातील काटोल आणि नरखेड तालुक्यात गारा पडल्या आहेत. संत्र्याचा बहार मोठ्या प्रमाणात गळून पडला असून यात शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. हवामान विभागाने पुढील दोन दिवस पाऊस कायम राहण्याचा इशारा दिला आहे.
बुलढाण्यात गारपीट शेतकरी वर्ग हवाल्दील
बुलढाण्यातील चिखली तालुक्यातील उदयनगर या गाव शिवारात प्रचंड गारपीट झाली आहे. दुपारपासून येथे वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. मात्र सायंकाळच्या सुमारास प्रचंड गारपीट झाली.
त्यामुळे शेतकऱ्याच्या शेतातील कांदा, मका व फळबागांचे नुकसान झाल्याची माहिती आहे. बुलढाण्यात देखील दुपारी 37.4 इतके तापमान होते. त्यानंतर आता पावसाने हजेरी लावली आहे. वातावरणातील या बदलामुळे मानवी आरोग्यावर परिणाम होताना दिसत आहे.
अहमदनगर अवकाळी पावसासह गारपीट
नगर जिल्ह्यातील काही भागात दुपारच्या सुमारास अवकाळी पावसासह गारपीट झाली आहे. कोपरगाव आणि राहाता तालुक्यातील जवळके, रांजणगाव, डोर्हाळे, सवंत्सर या गावांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस (Rain) आणि गारा कोसळल्याने शेतकऱ्यांची एकच धांदळ उडाली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.