Same-sex marriage: समलिंगी जोडप्याने दत्तक घेतलेल्या मुलावर होणारा परिणाम...; सरन्यायाधीश DY चंद्रचूड यांची महत्वपूर्ण टिप्पणी

लहान मुलांना दत्तक घेण्यासाठी या आधीच एकट्या व्यक्तीला परवानगी देण्यात आली आहे.
Same Gender Marriage
Same Gender MarriageSaam TV
Published On

Marriage Equality Case : समलिंगी विवाहांसाठी भारतात मान्यता मिळावी यासाठी सर्वोच्च न्यायालयात सध्या युनावणी सुरू आहे. अनेक मुद्दयांवर भारताचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड तसेच न्यायमूर्ती संजय किशन कौल, न्यायमूर्ती रवींद्र भट, न्यायमूर्ती हिमा कोहली आणि न्यायमूर्ती पीएस नरसिम्हा यांच्या खंडपीठात या मुद्द्यावर चर्चा सुरू आहे. (Marriage rights)

दत्तक घेतलेल्या मुलांवर होईल परिणाम

सदर खंडपीठात आज झालेल्या सुनावणीवेळी दत्तक मुलांवरून टिप्पणी करण्यात आली. जेव्हा समलिंगी जोडपी एखादे बाळ दत्तक घेतात तेव्हा त्या लहान बाळावर चांगले परिणाम होत नाहीत असा मुद्दा उपस्थित करण्यात याला. यावर टिप्पणी करताना सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी म्हटलं आहे की, लहान मुलांना दत्तक घेण्यासाठी या आधीच एकट्या व्यक्तीला परवानगी देण्यात आली आहे.

Same Gender Marriage
Gautami Sister : कसली भारी दिसते राव...; गौतमी की तिची बहिण?

म्हणजे अविवाहीत व्यक्ती आपल्या आयुष्यात मुलं हवं यासाठी एखादं बाळ दत्तक घेतात. कायद्यानुसार याला परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे जर एकटी व्यक्ती एखादं मुलं चांगल्या प्रकारे वाढवू शकते तर समलिंगी व्यक्तींमुळे लहान मुलांवर कसा परिणाम होऊ शकतो. समलिंगी जोडप्याने दत्तक घेतलेले मूल समलिंगी असेलच असे नाही, असं सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com