Washim Accident: वाशिममध्ये ३ वाहनांचा विचित्र अपघात, तिघांचा जागीच मृत्यू; ३ जण गंभीर

washim road accident: वाशिमच्या कारंजा तालुक्यातील कारंजा - पोहा मार्गावरील तुळजापूर धरणाजवळ तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला. या अपघातामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर ८ जण जखमी झाले आहेत.
Washim Accident: वाशिममध्ये ३ वाहानांचा विचित्र अपघात, तिघांचा जागीच मृत्यू; ३ जण गंभीर
Washim Accident Saam Tv
Published On

मनोज जैस्वाल, वाशिम

वाशिममध्ये भीषण अपघाताची घटना घडली आहे. वाशिमच्या कारंजा तालुक्यातील कारंजा - पोहा मार्गावरील तुळजापूर धरणाजवळ पीकअप, प्रवासी ऑटो आणि अन्य एक ऑटो अशा तीन वाहनांचा भीषण अपघात झाला. या अपघातात एका महिलेसह दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. तर ८ जण जखमी झाले आहेत. जखमींमधील तिघाची प्रकृती चिंताजनक आहे. हा अपघात ऐवढा भीषण होता यामध्ये वाहनांचा अक्षरशः चुराडा झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीकअप वाहन भरधाव वेगात पोहा येथून कारंजाच्या दिशेने जात होते. या वाहनाने विरुद्ध दिशेने येणाऱ्या प्रवासी ऑटोला समोरून जोरदार धडक दिली. या प्रवासी ऑटोच्या मागे दुसरा मालवाहु ऑटो येत होता. त्यालाही पीकअपची धडक बसली. तीन वाहनांच्या झालेल्या या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला. शालिनी उत्तम लोखंडे (३५ वर्षे, राहणार - बेलमंडळ), निलेश रमेश वनावसरे (२५ वर्षे, राहणार - पोहा) व मारुती पिराजी शिंदे (७० वर्षे, राहणार - मोरळ) अशी या अपघातामध्ये मृत्यू झालेल्यांची नावं आहेत.

Washim Accident: वाशिममध्ये ३ वाहानांचा विचित्र अपघात, तिघांचा जागीच मृत्यू; ३ जण गंभीर
Nashik Accident : नाशिकमध्ये भीषण अपघात, कंटेनरने रिक्षाला उडवले, ३ जणांचा मृत्यू, २ गंभीर

या अपघातामध्ये आसीफ खान कलीम खान (३८ वर्षे, राहणार - पोहा), इमरान पठाण (४० वर्षे, राहणार - दीपक चौक अकोला) आणि शाहिद नाजीम खान (१३ वर्षे, राहणार - करीम नगर कारंजा) हे तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. तर निर्मला ज्ञानेश्वर मानकर (६० वर्षे राहणार - पोहा), फौजीया परवीन आसिफ पठाण (२७ वर्षे राहणार - पोहा), अशोक महादेव नितनवरे (३२ वर्षे राहणार - पोहा), मेघा अशोक नितनवरे (२८ वर्षे राहणार - पोहा) आणि पंचफुला पाचंगे (६५ वर्षे, रा. मोहगव्हाण) हे सर्वजण किरकोळ जखमी झाले आहेत.

Washim Accident: वाशिममध्ये ३ वाहानांचा विचित्र अपघात, तिघांचा जागीच मृत्यू; ३ जण गंभीर
Pune Accident : भोरमध्ये भीषण अपघात, २ दुचाकी समोरासमोर धडकल्या, २ जणांचा जागीच मृत्यू

या अपघाताची माहिती मिळाताच वाशिम पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्याचसोबत सर्वधर्म आपत्कालीन संस्था आणि अन्य रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचल्या आणि त्यांनी जखमींना उपचारासाठी वाशिम येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. सर्व जखमीवर उपचार सुरू आहेत. तर गंभीर जखमी झालेल्यांना पुढील उपचारासाठी अकोला येथे हलवण्यात आले आहे. ३ जखमींची प्रकृती चिंताजनक आहे. वाशिम पोलिस या अपघाताचा तपास करत आहेत.

Washim Accident: वाशिममध्ये ३ वाहानांचा विचित्र अपघात, तिघांचा जागीच मृत्यू; ३ जण गंभीर
Goa paragliding accident: गोव्यात पॅराग्लायडिंग करताना मोठा अपघात, पुण्यातील तरूणीसह पायलटचा मृत्यू

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com