Groundnut Crop : अवकाळीचा फटका; भुईमूगाच्या शेंगाना जमिनीतच फुटले अंकुर

Washim News : अवकाळीमुळे रब्बी तसेच उन्हाळी पिकांचे मोठे नुकसान होत आहे. मान्सूनच्या पावसाप्रमाणे अवकाळी पाऊस सातत्याने पडत असल्याने शेतकऱ्यांना शेतातील माल देखील काढण्याची संधी मिळत नाही
Groundnut Crop
Groundnut CropSaam tv
Published On

मनोज जयस्वाल 
वाशिम
: साधारण १५ ते २० दिवसांपासून राज्यात सातत्याने अवकाळी पाऊस होत आहे. या पावसामुळे प्रचंड नुकसान झाल्याचे पाहण्यास मिळत आहे. कांदा, मका पिकांच्या नुकसानीसोबतच आता भुईमूंग उत्पादक शेतकऱ्यांना देखील अवकाळीचा फटका बसू लागला आहे. कारण परिपक्व झालेला भुईमूंग पावसामुळे काढणी झालेला नाही. यामुळे या शेंगाना आता जमिनीतच अंकुर फुटल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे. 

राज्यात होत असलेल्या अवकाळी पाऊस वाशिम जिल्ह्यात देखील मागील काही दिवसांपासून पडत आहे. अवकाळीमुळे रब्बी तसेच उन्हाळी पिकांचे मोठे नुकसान होत आहे. मान्सूनच्या पावसाप्रमाणे अवकाळी पाऊस सातत्याने पडत असल्याने शेतकऱ्यांना शेतातील माल देखील काढण्याची संधी मिळत नाही. यामुळे शेतकरी पूर्णतः हतबल झाला आहे. यामुळे कांदा, मका उत्पादक शेतकऱ्यांबरोबरच भुईमूंग उत्पादक शेतकऱ्यांना देखील याचा फटका बसू लागला आहे.  

Groundnut Crop
Sangli Crime : एसबीआय बँकेच्या एटीएमवर दरोडा; १६ लाखांची रोकड लंपास केल्याचा अंदाज

ऐन काढणीच्या वेळी पाऊस 

वाशिम जिल्ह्यात उन्हाळी भुईमुगाचा पेरा ५ हजार १४३ हेक्टरवर झाला होता. सध्या भुईमुगाचा काढणीचा हंगाम सुरू आहे. मात्र मागील काही दिवसात जिल्ह्यात अवकाळी पाऊसामुळे दुहेरी फटका बसला आहे. काढणीस आलेल्या भुईमूगाला उशीर झाला. त्यामुळे शेंगा परिपक्व होऊन कालावधी उलटल्याने जमिनीतच शेंगांना अंकुर फुटू लागल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे शेतकऱ्याचं नुकसान होत असून अवकाळीचा हा दुहेरी फटका शेतकऱ्यांना बसू लागला आहे.

Groundnut Crop
Chopda Accident : अनियंत्रित बसने दुचाकीसह पायी चालणाऱ्यांना उडविले; दोघांचा मृत्यू, दोन गंभीर जखमी

सततच्या पावसाने कांदा शेतात भिजला

मनमाड : नाशिकच्या मनमाड परिसरात सतत अवकाळी पाऊस होत आहे. या पावसाने शेतात चाळीत साठवण्यासाठी ठेवलेला शेकडो क्विंटल कांदा भिजल्याने कांदा उत्पादकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. गेल्या दहा ते बारा दिवसांपासून सारखा पाऊस कोसळत असल्याने कांदा चाळीत टाकण्यासही उसंत देत नसल्याने हा संपूर्ण कांदा आता भिजल्याने कांदा सडू लागला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे वार्षिक आर्थिक गणित कोलमडले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com