मनोज जयस्वाल
वाशीम : शालेय विद्यार्थ्यांना अन्न घटकातील पोषणतत्व पुरविण्यासाठी शासनाने चॉकलेट देण्याची योजना सुरू केली आहे. या चॉकलेटमध्ये निकृष्टपणा तसेच अळ्या निघत असल्याच्या घटना घडत असतांना वाशिममध्ये या चॉकलेट पोत्यांमध्ये भरून रस्त्यावर फेकून दिल्याची घटना उघडकीस आली आहे.
सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांना पोषक घटक मिळण्यासाठी शासनाने ज्वारी, बाजरी अशा धान्यापासून बनविलेले चॉकलेट (Poshan Aahar) देण्याची योजना काही दिवसांपासून सुरू केली आहे. या माध्यमातून वेगवेगळ्या फ्लेवरचे चॉकलेट विद्यार्थ्यांना दुपारच्यावेळी देण्यात येत असतात. विशिष्ट कंपनीने बनविलेले हे चॉकलेट शाळांवर पाठविले जातात. आणि शाळेवर विद्यार्थ्यांना वितरित केले जातात. मात्र बहुतेक वेळेस चॉकलेट खराब निघत असल्याचे समोर आले आहे.
दरम्यान वाशिममध्ये (Washim) भर रस्त्यावर चॉकलेट फेकलेले आढळल्यामुळे शासनाच्या या योजनेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तसेच अशाप्रकारे रस्त्यावर फेकून देणे कितपत योग्य आहे. कुणाच्या माध्यमातून हे चॉकलेट रस्त्यावर फेकण्यात आले. याची सखोल चौकशी होण्याची गरज निर्माण झाली आहे. सदर चॉकलेटची पाहणी केली असता त्याची एक्सपायरी डेट अजून संपलेली नसल्याचे दिसून आले. तरी देखील अशाप्रकारे चॉकलेट फेकलेले आढळल्यामुळे पोषण आहाराच्या एकूणच प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.