अमर घटारे
अमरावती : देवेंद्र फडणवीस हे स्वतःला पैलवान समजतात. मात्र कितीही पहेलवान असला तरी आपल्याकडे वस्ताद आहे. पवार साहेब वस्ताद असल्याने वस्ताद एक डाव नेहमी राखून ठेवत असतात. त्यांनी लोकसभेत एक डाव वापरला. आता विधानसभेत अनेक डाव वापरतील. गुजरातचे लोक डोकं खाजवत राहतील; असं म्हणत रोहित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना डिवचत बोचरी टीका केली आहे.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पहेलवान म्हणुन उल्लेख केला होता. मात्र आमच्यासमोर कोणी दुसरा पहेलवान दिसत नाही; असं वक्तव्य केलं होतं. त्यामुळे त्यांचं हे वक्तव्य २०१९ च्या निवडणुकीत मोठ्या चर्चेचे कारण ठरल होत. त्यांच्या या विधानाची रोहित पवार (Rohit Pawar) यांनी पुन्हा आठवण करून देत देवेंद्र फडणवीस यांना डिवचल आहे.
बटेंगे तो कंटेंगे या योगींच्या वक्तव्याचा पंकजा मुंडे यांनी चांगला समाचार घेतला असून त्यांनी यावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. यावर रोहित पवार यांना विचारले असता त्यांनी पंकजा मुंडे यांच्या भूमिकेचे स्वागत केले आहे. पंकज मुंडे यांनी जे वक्तव्य केल ते योग्य आहे.
फडणवीसांनी द्वेष पसरवण्याचे काम केले
बटेंगे तो कंटेंगे ही संस्कृती महाराष्ट्राची नाही. नितीन गडकरी यांनी देखील चांगलं वक्तव्य केलं आहे. पण हे विचार देवेंद्र फडणवीस यांच्या डोक्यात जातील का? कारण त्यांनी द्वेष पसरवण्याचे काम केले आहे. समाजाला वाटण्याचे काम फडणवीस यांनी केले आहे. असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांच्या पुन्हा जोरदार टीका केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.