Nitin Deshmukh : दिल्लीतील नेत्यांकडून राजकीय कट रचला जातोय; आमदार नितीन देशमुख यांचा आरोप

Akola News : खतिबा यांना काँग्रेसने भरपूर काही दिलं. चार वेळा उमेदवारी त्यानंतर आमदारकी, एकदा विधानपरिषद उमेदवारी दिली. त्यानंतरही त्यांनी काँग्रेस सोबत गद्दारी केली
Nitin Deshmukh
Nitin DeshmukhSaam tv
Published On

अक्षय गवळी 

अकोला : बाळापुरातील वंचितचा उमेदवार ऍड. नातिकोद्दीन खतिब हा एकनाथ शिंदेंनी उभा केलेला उमेदवार आहे. तर शिंदे गटाकडून उभा असलेला उमेदवार खतीब यांनी उभा केलेला उमेदवार आहे. त्यामुळ बाळापुरात दोन गद्दार आणि उद्धव ठाकरेंचा निष्ठावंत आमदार अशी लढत दिसणार आहे. मुख्य म्हणजे दिल्लीत बसलेल्या नेत्यांकडून आपल्या विरोधात राजकीय कट रचला जात असल्याचा आरोप ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुखांनी केला. 

देशमुखं बोलतांना म्हटले, कि खतिबा यांना काँग्रेसने भरपूर काही दिलं. चार वेळा उमेदवारी त्यानंतर आमदारकी, एकदा विधानपरिषद उमेदवारी दिली. त्यानंतरही त्यांनी काँग्रेस सोबत गद्दारी केली. दुसरीकडे शिंदेंचा उमेदवार बळीराम सिरस्कार यांनी अनेक पक्ष बदलले. सुरुवातीला वंचितने त्यांना दोन वेळा आमदार केले. महाविकास आघाडीचे सरकार असताना राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि तिथूनही पक्ष सोडला आणि भाजपची वाट धरली. आता शिंदे यांच्या शिवसेनेत जाऊन उभे राहिले. सिरस्कारांना खतिब यांनी उभ केले असल्याचे नितीन देशमुख म्हणाले. 

Nitin Deshmukh
Jalgaon Accident : वाढदिवसाच्या दिवशीच मृत्यूने गाठले; अपघातात तरुणाचा मृत्यू

दरम्यान, आता दोन्ही उमेदवारांमध्ये अंतर्गत वाद सुरू झाला आहे. दिल्लीवरून फोन येतो आणि खतिबला म्हणतात, तुम्ही तिथं काय करताय? तुम्हाला मतांचे विभाजनासाठी उभे केले? तर सिरस्कारांना वेगळा आदेश येतो. त्यामुळे मतदान कुणाला करायचं सांगावे, हा सर्व संभ्रम त्यांच्यात आहे. त्यामुळे दोन गद्दार आणि निष्ठावंत उमेदवार अशी लढत असणार असल्याचे देशमुख म्हटले.

Nitin Deshmukh
Shirdi News : साईभक्तांसाठी आनंदाची बातमी..फुल हार नेण्यास घातलेली बंदी उठवली; तीन वर्षानंतर वाहता येणार समाधीवर फुले

त्यांनी प्रत्येक मतदारसंघात दिले कोट्यवधी रुपये 
आपल्या मतदारसंघात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी प्रति मतदार दहा हजार रुपये पाठवल्याचा खळबळ देण्यात आरोप त्यांनी केला होता. मात्र, महायुतीकडून आलेले पैसे घ्या आणि मतदान मात्र मलाच करा; असा सल्ला देशमुखांनी मतदारांना दिला होता.‌ महाराष्ट्रात महाविकास आघाडीला पराभूत करण्यासाठी प्रत्येक मतदारसंघात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी कोट्यावधी रुपये पाठवल्यात आरोप त्यांनी केला होता.

संपूर्ण महाराष्ट्राचं बाळापूरकडं लक्ष
अकोला जिल्ह्यातील बाळापुर मतदार संघाच्या लढतीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागले आहे. या मतदारसंघात शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून विद्यमान आमदार नितीन देशमुख यांना परत दुसऱ्यांदा रिंगणात उतरवण्यात आलं आहे. राज्यात शिवसेनेतील बंडानंतर शिंदेंच्या खेम्यात गेले आमदार नितीन देशमुख गुवाहाटीवरून परत ठाकरेंच्या शिवसेनेत आले होते. त्यानंतर आमदार नितीन देशमुख यांनी सातत्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर सातत्याने गंभीर आरोप केले होते. याच पार्श्वभूमीवर बाळापूर विधानसभा मतदारसंघात शिंदे यांच्या शिवसेनेकडून बळीराम सिरस्कार तर वंचितकडून सय्यद नातिकोद्दीन खतीब हे दोन माजी आमदार रिंगणात आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com