मनोज जायस्वाल, साम टीव्ही
Washim Sagar Chumbalkar News: सागर नावाने शहरात परिचित असलेला युवक विविध सामाजिक राजकीय कार्यक्रमात सहभागी असायचा, त्यामुळे त्याची धडपड्या मुलगा म्हणून ओळख होती. मात्र, गेली अनेक वर्षे त्याने स्त्री असल्याचे रहस्य मनात दाबून टाकले.
परंतु सत्य किती दिवस झाकले जाणार म्हणून त्याने धाडस केले आणि तब्बल ३८ वर्षानंतर आपण पुरूष नसून एक स्त्री असल्याचे खुल्या मनाने जाहीर केले. यासाठी तिरुपति लॉन येथे तेरा तुझको अर्पण अभिनंदन समारोह संपन्न झाला. (Latest Marathi News)
वाशिमच्या (Washim News) सागर चुंबळकर नावाच्या एका व्यक्तीची ही गोष्ट. सागर चुंबळकर गेल्या अनेक वर्षापासून युवक म्हणून समाजात वावरत होता. अनेक समाजकार्यामध्ये त्याचा वावर होता. मुळात सागरचा जेव्हा जन्म झाला. तेव्हा कुटुंबियांनी त्याला पुरूष म्हणून ओळख दिली. जेव्हा सागर शाळेत जायचा तेव्हा त्याच्या विचारात बदल आणि आणि त्याने स्वत:ला पुरूष म्हणून स्वीकारलं.
वयाच्या आठव्या वर्षी सागर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संपर्कात आला. तो संघाचा विचाराने इतका प्रेरित झाला की, त्याला पुरूषपण सोडावंच वाटलं नाही. वयाच्या तेराव्या वर्षी सागरला तो पुरूष नसून बाई आहे याची जाणीव झाली. मात्र आपण पुरूष नसून स्त्री आहे हे त्याला अजिबात समाजाला कळू द्यायचं नव्हतं म्हणून त्याने थेट शाळा सोडली.
त्यानंतर सागरने धार्मिक व सामाजिक कार्याची सुरूवात केली. त्यांने बजरंग दल, विश्व हिंदू परिषदेचे दायित्व सांभाळले व आपले संपूर्ण कार्य पणाला लावले. तसेच मुलींना संघटित करून संरक्षणासाठी त्यांना दुर्गा वाहिनीच्या शौर्य प्रशिक्षणासाठी पाठवले. या सगळ्या कार्यामधे विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. अनेक रुग्णांना रक्त सुद्धा उपलब्ध करून दिले.
सागरने गौरक्षनासाठी सुद्धा कार्य केले. हे सगळे करत असतांना खरतर सागर यांनी आपली खरी ओळख समाजापासून लपवून कार्य केले. मुळात मुलगी असताना मुलगा म्हणून वयाची ३८ वर्ष समाजकार्यात घालविली आणि २० ऑगस्ट रोजी घेण्यात आलेल्या तेरा तुझको अर्पण, या सोहळ्यामधे सगळ्यांच्या साक्षीने आपण मुलगी असल्याचे जाहीर केले.
यासाठी सगळ्यांच्या साक्षीने साधु संतांच्या उपस्थितीत हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. तसेच संतांच्या उपस्थितीत सागर चे संगरा असे नामकरण करून शास्त्रानुसार विधि सुद्धा करण्यात आला. यापुढे सागर आता संगरा चुंबळकर या नावाने ओळखल्या जाणार आहे.
Edited by - Satish Daud
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.