Washim : वाशिममध्ये एमआयएमची मुसंडी, पहिल्यांदाच नगरपालिकेवर सत्ता मिळवली, भाजपचा पराभव

Washim Karanja Nagarpanchayat And Nagarparishd MIM News : वाशिम जिल्ह्यातील कारंजा नगरपालिकेत एमआयएम पक्षाने ३१ पैकी १६ जागांवर विजय मिळवत स्पष्ट बहुमत सिद्ध केले आहे. या निकालामुळे भाजपला मोठा राजकीय धक्का बसला आहे.
Washim : वाशिममध्ये एमआयएमची मुसंडी,  पहिल्यांदाच नगरपालिकेवर सत्ता मिळवली, भाजपचा पराभव
Washim Karanja Nagarpanchayat And Nagarparishd MIMSaam Tv
Published On
Summary
  • कारंजा नगरपालिकेत एमआयएमला स्पष्ट बहुमत

  • ३१ पैकी १६ जागांवर एमआयएमचा विजय

  • भाजपच्या आमदार सई डहाके पराभूत

  • भाजपाला धक्का

मनोज जैस्वाल, वाशीम

राज्यभरातील नगरपालिका सह नगरपंचायतीचे निकाल आले. मात्र,यामध्ये सर्वात धक्कादायक निकाल होता, तो वाशिम जिल्ह्यातील कारंजा नगरपालिकेचा. या नगरपालिकामध्ये एमआयएम पक्षाने नगराध्यक्ष पदासह १६ जागांवर विजय संपादन करत नगरपालिकेवर स्पष्ट बहुमत सिद्ध केल आहे. तर भाजपा १३, काँग्रेस -१ आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाने एका जागेवर विजय मिळवला आहे.

कारंजा नगर परिषदेमध्ये ३१ सदस्य पदाच्या जागांपैकी तब्बल १६ जागा एमआयएम (MIM) पक्षाने जिंकून आणल्या आहेत. त्यामुळे MIM पक्षाच्या नगराध्यक्षासह उपाध्यक्ष पदावर दावा स्पष्ट केला आहे. त्यामुळे हा भाजपच्या विद्यमान आमदार सई डहाके यांना मोठा धक्का आहे.

Washim : वाशिममध्ये एमआयएमची मुसंडी,  पहिल्यांदाच नगरपालिकेवर सत्ता मिळवली, भाजपचा पराभव
Crime : सैराटची पुनरावृत्ती! प्रेमविवाह केल्याचा राग, बापाकडून गर्भवती मुलीची हत्या; नवरा अन् सासू-सासऱ्यांनाही सोडलं नाही

एमआयएम पक्षाचे राज्य उपाध्यक्ष युसुफ पुंजांनी यांनी आतापर्यंत अनेक राजकीय पक्षात आपली राजकीय ताकद दाखवून दिलेली आहे. त्यांनी आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी या पक्षासोबत राहून काम केलं आणि ज्या ज्या वेळेस ज्या पक्षात त्यांनी निवडणूक लढवली, त्या त्या पक्षाची ताकद त्यांनी सत्तेच्या रूपात दाखवून दिल्याचे चित्र आतापर्यंत पाहायला मिळालं. दरम्यान अवघ्या काही दिवसांवर महानगरपालिकेच्या निवडणुका येऊन ठेपल्या आहेत. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नेमकी कोणात्या पक्षाला मिळणार हॉट सीट हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com