मनोज जयस्वाल, साम टीव्ही
वाशिम जिल्ह्यातील कारंजा ते मानोरा मार्गावरील कुपटा घाटात आज एक अत्यंत भीषण अपघाताची घटना घडली आहे. कार आणि टिप्पर दरम्यान झालेल्या या जोरदार धडकेत कारमधील दोघांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात इतका भीषण होता की, यामध्ये कारच्या समोरील भागाचा (डोनेट) अक्षरशः चक्काचूर झाला असून महामार्गावर दोन्ही बाजूनी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबधित कार कुपटा येथून मानोरच्या दिशेने जात होती. दरम्यान कुपटा घाटात समोरून येणाऱ्या एका वेगवान टिप्परने कारला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात प्रवास करत असलेल्या दोन व्यक्तींचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच 108 रुग्णवाहिकेचे पायलट लक्ष्मण चव्हाण यांनी तातडीने रुग्णवाहिकेसह घटनास्थळ गाठले. त्यानंतर दोन्ही मृतदेह पुढील कायदेशील कार्यवाहीसाठी आणि पोस्टमार्टमसाठी मानोरा येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले आहेत. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनीही तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून, या अपघातामुळे घाटातील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. पोलीस सध्या या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
जालना जिल्ह्यातील अंबड-वडीगोद्री मार्गावर भीषण अपघाताची घटना घडली आहे. शहापूर परिसरात दोन एसटी बसची समोरासमोर धडक झाली असून या अपघातात दोन्ही बसचे चालक गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातात बसमधील विद्यार्थ्यांसह सुमारे 25 ते 30 प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे मानव विकास मानव विकास योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी बस भांबेरीहून अंबडकडे जात असताना हा अपघात घडला.
मानव विकासच्या बसमध्ये 25 ते 30 विद्यार्थी असल्याची माहिती असून, दुसऱ्या बसमध्ये 12 ते 15 प्रवासी प्रवास करत होते. धडकेची तीव्रता इतकी होती की दोन्ही बसचे मोठे नुकसान झाले आहे. अपघातानंतर स्थानिक नागरिक आणि प्रशासनाने तात्काळ मदतकार्य सुरू करत जखमींना अंबड येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलवले. जखमींवर सध्या उपचार सुरू असून काहींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.