Washim Accident: ७ मिनिटांच्या फरकाने एकाच ठिकाणी २ अपघात, रिसोड-हिंगोली मार्गावरील घटना; १२ जण गंभीर जखमी

Washim Car Accident: वाशिममध्ये अपघाताच्या २ घटना घडल्या आहेत. एकाच ठिकाणी ७ मिनिटांच्या फरकाने हे अपघात झाले आहेत. अपघातामध्ये १२ जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये दोघांची प्रकृती गंभीर आहे.
Washim Accident: ७ मिनिटांच्या फरकाने एकाच ठिकाणी २ अपघात, रिसोड-हिंगोली मार्गावरील घटना; १२ जण गंभीर जखमी
Washim Accident News Saam Tv
Published On

मनोज जैस्वाल, वाशिम

वाशिममध्ये अपघाताच्या दोन घटना घडल्या आहेत. वाशिमच्या रिसोड ते हिंगोली मार्गावर अपघाताच्या या घटना घडल्या आहेत. रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे एकाच ठिकाणी दोन वेगवेगळ्या अपघातात १२ जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींमध्ये सात महिलांचा समावेश आहे. या अपघाताचा तपास वाशिम पोलिसांकडून सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रिसोडवरून हिंगोलीच्या दिशेने जात असलेल्या एका कारवरील चालकाचे नियंत्रण सुटले. त्यामुळे ही कार रस्त्याच्या कडेला असलेल्या नालीमध्ये पडली. सुदैवाने गाडीतील एअर बॅग उघडल्याने कारमधील तीन जन किरकोळ जखमी झाले. तर याच ठिकाणी दुसरा अपघात देखील झाला. अवघ्या ७ मिनिटांनंतर रिसोडकडे येत असलेली क्रुझर ही रस्त्याचा अंदाज न आल्याने थेट मातीच्या ढिगाऱ्यावर चढली.

Washim Accident: ७ मिनिटांच्या फरकाने एकाच ठिकाणी २ अपघात, रिसोड-हिंगोली मार्गावरील घटना; १२ जण गंभीर जखमी
Pune Accident : भोरमध्ये भीषण अपघात, २ दुचाकी समोरासमोर धडकल्या, २ जणांचा जागीच मृत्यू

या अपघातामध्ये ९ जण जखमी झाले आहेत. या दोन्ही अपघातांमध्ये १२ जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये महिलांचा देखील समावेश आहे. अपघातामध्ये जखमी झालेल्या सर्वांना रिसोड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. उपचारामध्ये सायराबी सरदार खान आणि शमीम परविन एजाज खान यांची प्रकृती गंभीर आहे. त्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी वाशीम येथे दाखल करण्यात आले आहे.

Washim Accident: ७ मिनिटांच्या फरकाने एकाच ठिकाणी २ अपघात, रिसोड-हिंगोली मार्गावरील घटना; १२ जण गंभीर जखमी
Samruddhi Mahamarg Accident : भीषण अपघात; चालकाला डुलकी लागल्याने कार ट्रकवर आदळली, एकाचा जागीच मृत्यू, एक गंभीर जखमी

दरम्यान, मनमाडमधील नगर-मनमाड महामार्गावर सातत्याने अपघातांची मालिका सुरु असून येवल्याच्या पिंपळगाव जलाल टोक नाक्याजवळ भरधाव आयशर ट्रकने गतीरोधकाजवळ अचानक ब्रेक दाबल्याने पाठी मागून येणारा कंटेनर त्यावर धडकला. या धडकेनंतर आयशर ट्रक पुढे जाऊन पलटी झाला.

अपघातामध्ये कंटेनरच्या पुढील भागाचा चक्काचूर होऊन त्यामध्ये चालक अडकला. त्याला बाहेर काढण्यासाठी अखेर जेसीबीची मदत घेण्यात आली. यावेळी तातडीने चालकाला येवल्यातील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्यानंतर पुढील उपचारासाठी नाशिक येथे हलविण्यात आले.

Washim Accident: ७ मिनिटांच्या फरकाने एकाच ठिकाणी २ अपघात, रिसोड-हिंगोली मार्गावरील घटना; १२ जण गंभीर जखमी
Milk Tanker Accident: शिंदवणे घाटात दुधाच्या टँकरचा अपघात; चालकाचा जागीच मृत्यू, एकजण गंभीर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com