बुलढाणा : समृद्धी महामार्गावरील अपघातांची मालिका थांबता थांबत नसल्याचे पाहण्यास मिळत आहे. यात समृद्धी महामार्गावरील चानैज क्रमांक ३३६.८ मुंबई कॉरिडोरवर भीषण अपघात झाला. कार आणि ट्रकच्या भीषण अपघातात एका जणाचा जागीच मृत्यू झाला. तर सोबत असलेल्या मित्र गंभीर जखमी झाला आहे.
समृद्धी महामार्गावर होत असलेल्या अपघातांची मालिका थांबलेली नाही. भरधाव वेगात वाहने चालविली जात असल्याने वाहन अनियंत्रित होऊन अपघात होत आहेत. असाच अपघात आज सकाळच्या सुमारास घडला. अपघात एवढा भीषण होता की, यामध्ये कारचा अक्षरशः चुराडा होऊन रस्त्यावर कारचे पार्ट वेगवेगळे होऊन विखुरली गेले. सकाळी नागपूर येथील कार चालक श्रव मेलानी (वय २०) आपल्या मित्रासोबत नागपूरवरून संभाजीनगरकडे जाण्यासाठी निघाले होते.
झोपेची डुलकी लागून कार अनियंत्रित
सकाळची वेळ असल्याने कारचालकाला झोपेची डुलकी लागली. यातच कार अनियंत्रित होऊन समोर जात असलेला ट्रकवर जाऊन धडकली. ट्रक चालक वैभव रावसाहेब व्यवहारे (वय २८, रा. कवडीपाट, लोणी काळभोर, ता. हवेली, जि. पुणे) हे हळुवारपणे इमर्जन्सी लेनवर आपले वाहन चालवत होता. याच वेळी पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या कारच्या चालकाला झोपेमुळे समोरील ट्रकचा अंदाज न आल्याने पाठीमागून उजव्या साईडच्या टायर जवळ कार धडकली.
एकाच जागीच मृत्यू
धडकेत ड्रायव्हरच्या बाजूला समोर बसलेले कारमधील सुजोग सोनी (वय २०) याचा जागेवरच मृत झाला. तर सोबत असलेले आयुष जैन (वय २०) हा गंभीर जखमी झाला. चालक किरकोळ जखमी झाला. त्यांना तात्काळ समृद्धी महामार्ग ॲम्बुलन्सने जखमीला जागेवर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी जालना येथे नेण्यात आले. तसेच, समृद्धी महामार्ग क्यूआरव्ही टीमचे कैलास आघाव, श्रीकृष्ण बच्छीरे, अभिषेक काणेकर यांच्या टीमने सर्वांनी अथक प्रयत्न करून मृतक व जखमी यांना वाहनाच्या बाहेर काढले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.