अक्षय बडवे
पुणे : एटीएममध्ये जर पैसे काढायला जात असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्वाची आहे. कारण एक आंतरराज्यीय टोळी सध्या पुणे जिल्ह्यातील अनेक एटीएम बाहेर अनेकांना गंडा घालत आहेत. हात चलाखी करुन एटीएमची अदला-बदल करणे. तसं न घडल्यास दमदाटी करुन एटीएम कार्ड घेऊन पैसे लुबाडणूक केली जात आहे. ठिकठिकाणी या टोळीने अनेकांची लुबाडणूक केली असून या टोळीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी जाणाऱ्या नागरिकांची नजर चुकवून एटीएम कार्डाची अदलाबदल केली जात होती. यानंतर यातून पैसे काढून घेत होते. तर कार्ड अदलाबदल करण्याचे जमणे नाही तर थेट सदरच्या इसमास धमकी देत त्यांची लुबाडणूक करत होते. असे अनेक प्रकार मागील काही दिवसात घडले होते. या प्रकरणी पोलिसात तक्रार देखील दाखल करण्यात आली होती. यामुळे पोलिसांकडून सदर टोळीचा शोध सुरू होता.
महाराष्ट्रासह उत्तर प्रदेशातही केली फसवणूक
महाराष्ट्रासह उत्तर प्रदेशात या टोळीने अनेकांना गंडा लावल्याचे आतापर्यंत समोर आले आहे. ही टोळी साताऱ्याच्या दिशेने खेड-शिवापूर टोल नाक्यावरुन भरधाव वेगाने गाडी घेऊन गेली. हे पाहून सहाय्यक पोलीस निरीक्षकाने राजगड पोलिसांनी कळवलं. तिथं सापळा रचून या टोळीला जेरबंद करण्यात आलं. या टोळीनं आणखी कुठं आणि किती जणांना गंडा घातलाय, याचा तपास पुणे ग्रामीण पोलीस करत आहे.
१४७ एटीएम कार्ड जप्त
राजगड पोलिसांनी तिघांना बेड्या ठोकत, चोरीचे तब्बल 147 एटीएम ही जप्त केले आहेत. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्यांमध्ये समून रमजान, नसरुद्दीन खान आणि बादशाह खान अशी अटकेत असलेल्या चोरट्यांची नावं आहेत. तर आदिल खानचा शोध सुरु आहे. हे सर्वजण मूळ उत्तरप्रदेश आणि हरियाणा राज्याचे रहिवाशी आहेत. या प्रकरणी आणखी तपास सुरु आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.