Maharashtra Weather Alert: बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात पावसासाठी पोषक वातावरण तयार झालं आहे. येत्या चार ते पाच दिवसात राज्यात ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस कोसळणार, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
हवामान विभागाचा अंदाज खरा ठरला, तर खरीप हंगामातील पिकांना मोठा दिलासा मिळेल. गणपती बाप्पाच्या आगमनानंतर राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
हवामान खात्याचा अंदाज तंतोतंत खरा ठरला नसला, तरी बऱ्याच जिल्ह्यांमध्ये पावसाच्या हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळल्या. त्यामुळे खरीप हंगामातील पिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून मुंबई, कोकण, ठाण्यासह नाशिक, जळगाव, धुळे, अहमदनगर आणि पुणे, जिल्ह्यांमध्ये पावसाच्या हलक्या सरी कोसळत आहेत.
याशिवाय रत्नागिरी, सातारा, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, गडचिरोली, भंडारा, जालना, नांदेड आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्येही तुरळक ठिकाणी पाऊस झाला आहे. दरम्यान, आता पुढील चार ते पाच दिवसात राज्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
येत्या २१ सप्टेंबरपासून म्हणजेच उद्यापासून राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान तज्ज्ञ के.एस होसळीकर यांनी ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे. येत्या चार ते पाच दिवसात राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडणार, असं होसळीकर यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
आजपासून पुढील चार ते पाच दिवस मुंबई, कोकण, पुणे, ठाणे, पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्ये तसेच मराठवाड्यात मुसळधार पाऊस होईल. विदर्भ- बुलढाणा, वाशिम, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, नागपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा या जिल्ह्यांनाही पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
Edited by - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.