Wardha News
Wardha NewsSaam tv

Wardha News: म्हसाळा ग्रामपंचायतीचे सरपंच अपात्र

म्हसाळा ग्रामपंचायतीचे सरपंच अपात्र
Published on

चेतन व्यास

वर्धा : वर्धा शहरालगतच्या म्हसाळा ग्रामपंचायतीच्या सरपंचांनी अतिक्रमण केल्या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार होती. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी चौकशीअंती ग्रामपंचायत (Gram Panchayat) सरपंच मंगला ईश्वर काचोळे यांना अपात्र घोषित केले आहे. (Maharashtra News)

Wardha News
Wardha: को– ऑपरेटीव्ह बँकेच्या आठ हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीची प्रतिक्षा

म्‍हसाळा येथील (wardha) सरपंच मंगला काचोळे यांच्या परिवाराच्या अतिक्रमणाबाबत गावातील राजू टिपले यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. सरपंचाच्या परिवारातील सदस्यांनी शासकीय जागेवर अतिक्रमण केले आहे. इतकेच नाही तर अतिक्रमित जागेबद्दल ग्रामपंचायतीच्या रेकॉर्डवर चुकीची नोंद घेण्यात आल्याचेही तक्रारीत नमूद केले होते.

न्‍यायालयाचा आदेश असा

ज्या ग्रामपंचायत सदस्यांनी अतिक्रमण केले आहे. ते सदस्यत्वासाठी पात्र ठरत नाही; असा न्यायालयाचा आदेश आहे. त्यामुळे टिपले यांच्या तक्रारीवरून सरपंचांच्या अतिक्रमणासंदर्भात चौकशी केली असता त्यामध्ये सत्यता आढळून आली. चौकशीअंती सुनावणीदरम्यान सरपंच आपली बाजू मांडू शकल्या नसल्याने जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी सरपंच मंगला काचोळे यांना महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ अंतर्गत अपात्र ठरविले. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश पारित केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com