Wardha News: 'सत्ता आल्यावर लाडकी बहीणचे पैसे बंद', काँग्रेस नेत्यांच्या नावाने पोस्ट व्हायरल; भाजप कार्यकर्त्याविरोधात तक्रार

Wardha Politics News: जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार नोंदवत पोस्ट बनविणारा, पोस्ट व्हायरल करणारा व ग्रुप ऍडमिन यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे.
Wardha News: 'सत्ता आल्यावर लाडकी बहीणचे पैसे बंद', काँग्रेस नेत्यांच्या नावाने पोस्ट व्हायरल; भाजप कार्यकर्त्याविरोधात तक्रार
Wardha Politics News: Saamtv
Published On

चेतन व्यास, वर्धा

Maharashtra Assembly Election 2024: लाडकी बहीण योजनेबाबत चुकीची माहिती आणि काँग्रेस नेत्यांचे फोटो वापरुन सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आमचे सरकार आल्यावर आल्यावर लाडक्या बहिणींचे पैसे बंद करणार असा आशय या व्हायरल पोस्टवर लिहण्यात आला असून काँग्रेसचे माजी मंत्री सुनील केदार व रणजित कांबळे यांचे फोटो वापरण्यात आलेत. याप्रकरणी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार नोंदवत पोस्ट बनविणारा, पोस्ट व्हायरल करणारा व ग्रुप ऍडमिन यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे.

Wardha News: 'सत्ता आल्यावर लाडकी बहीणचे पैसे बंद', काँग्रेस नेत्यांच्या नावाने पोस्ट व्हायरल; भाजप कार्यकर्त्याविरोधात तक्रार
Maharashtra Politics: हरियाणाची पुनरावृत्ती होणार, राज्यात महायुतीचे सरकार येणार: CM एकनाथ शिंदेंना विश्वास

राज्यात निवडणुका जाहीर होताच राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. खोट्या व बनावटी पोस्ट तयार करून एकमेकांवर आरोपचे सत्र सुरु झाले आहे. अशातच आमचं सरकार आल्यावर लाडक्या बहिणींना मिळणारे पैसे बंद करणार अश्या आशयाचे काँग्रेसचे माजी मंत्री सुनील केदार व रणजित कांबळे यांचे फोटो वापरत सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल करण्यात आल्याचे समोर आले आहे.

देवळी विधानसभेचे भाजपचे संभाव्य उमेदवार यांच्या समर्थक ग्रुपवरून ही पोस्ट व्हायरल करण्यात आली आहे. या प्रकरणी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार नोंदवत पोस्ट बनविणारा, पोस्ट व्हायरल करणारा व ग्रुप ऍडमिन यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. या प्रकरणी पोलीस अधीक्षकांनी कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. या प्रकरणावरुन आता काँग्रेस नेत्यांनी संताप व्यक्त केला आहे.

Wardha News: 'सत्ता आल्यावर लाडकी बहीणचे पैसे बंद', काँग्रेस नेत्यांच्या नावाने पोस्ट व्हायरल; भाजप कार्यकर्त्याविरोधात तक्रार
Pune Crime: मोबाईल काढून घेतल्याने अल्पवयीन मुलाचा आईवर हल्ला, लाथाबुक्क्यांनी मारहाण अन् कात्रीने वार, पुण्यात खळबळ

दोन दिवसांपासून समाजमाध्यमावर लाडकी बहीण योजने संदर्भात बनावटी पोस्ट तयार करून बदनामी केली जातं आहे. काँग्रेसचे नेते सुनील केदार व माझा फोटो वापरून विरोधक हे कृत्य करत आहे. सुनील केदार यांनी लाडकी बहीण योजना आमचं सरकार आल्यावर बंद करणार असं वक्तव्य कुठेच केल नाही, तरीही त्यांचा आणि माझा फोटो वापरून भाजपा बदनामी करत आहे. मागील अडीच वर्षांपासुन राज्यात महायुतीचे सरकार आहे त्यांनी निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन ही योजना कोणतीही आर्थिक तरतूद न करता योजना आणली, अशी टीका आमदार रणजित कांबळे यांनी केली आहे.

Wardha News: 'सत्ता आल्यावर लाडकी बहीणचे पैसे बंद', काँग्रेस नेत्यांच्या नावाने पोस्ट व्हायरल; भाजप कार्यकर्त्याविरोधात तक्रार
Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंचा डबल धमाका, महायुतीला 'दे धक्का',भाजप- राष्ट्रवादीचे २ बडे नेते शिवबंधन बांधणार; आज मातोश्रीवर पक्षप्रवेश

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com