Maharashtra Assembly Election : शिंदेसेनाला झटका, काँग्रेसला फटका; पराभवाचा वचपा काढण्यासाठी डॉ हिना गावित विधानसभेच्या मैदानात

Heena Gavit News : लोकसभा निवडणुकीत डॉ. हिना गावित यांच्याविरोधात उघडपणे भूमिका घेऊन काँग्रेसला या मतदारसंघातील शिवसेनेच्या शिंदे गटाचे संपर्क प्रमुख चंद्रकांत रघुवंशी यांनी मदत केली होती.
हिना गावित
हिना गावितहिना गावित
Published On

सागर निकवाडे, नंदुरबार

Maharashtra Assembly Election : नंदुरबार लोकसभा मतदारसंघात पराभूत झाल्यानंतर भाजपच्या माजी खासदार डॉ. हिना गावित यांनी आता विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. गेल्या महिन्याभरापासून त्या अक्कलकुवा-अक्राणी मतदारसंघात तळ ठोकून आहेत. त्यातच त्यांचे वडील राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी याच मतदारसंघात विकास कामांच्या उद्घाटनाचा लावलेला धडाका यामुळे या मतदारसंघात महायुतीकडील इच्छुकांची धाकधूक वाढली आहे.

लोकसभा निवडणुकीत डॉ. हिना गावित यांच्याविरोधात उघडपणे भूमिका घेऊन काँग्रेसला या मतदारसंघातील शिवसेनेच्या शिंदे गटाचे संपर्क प्रमुख चंद्रकांत रघुवंशी यांनी मदत केली होती.

दोन टर्मपासून खासदार राहिलेल्या हिना गावित यांना मागील लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे नेते तथा माजी मंत्री ॲड. के. सी. पाडवी यांचे पुत्र ॲड. गोवाल पाडवी यांच्याकडून पराभवाची धूळ चाखावा लागली. पराभवानंतर डॉ. गावित या नंदुरबारच्या राजकारणात अधिकच सक्रिय झाल्या आहेत. अक्कलकुवा-अक्राणी मतदारसंघात त्यांनी कार्यकर्त्यांच्या बैठकांचा सपाटा लावला आहे.

हिना गावित
Maharashtra Assembly Election 2024 : तिसरी आघाडी, काम बिघाडी; विधानसभा निवडणुकीत कोणाची मते खाणार? पाहा व्हिडिओ

या मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाकडून इच्छुक विजयसिंग पराडके आणि किरसिंग वसावे यांनी लोकसभा निवडणुकीत उघडपणे डॉ. हिना गावित यांच्या विरोधात प्रचार केला होता. काँग्रेसचे माजी मंत्री ॲड. के. सी. पाडवी हे सलग ३५ वर्षांपासून अक्कलकुवा-अक्राणीचे आमदार आहेत. त्यांच्याच मुलाने डॉ. हिना गावित यांचा पराभव केला. त्यामुळे पाडवी पिता-पुत्रांना त्यांच्याच मतदारसंघात पराभूत करण्यासाठी डॉ. हिना गावित यांनी कंबर कसली असल्याचे म्हटले जाते. डॉ. गावित यांच्या भूमिकेने शिंदे गटातील नेतेही धास्तावले आहेत.

हिना गावित
Maharashtra Politics: आदित्य ठाकरेंना घेरण्यासाठी महायुतीने डाव टाकला! वरळी विधानसभेसाठी भाजपचा चेहरा ठरला?

लोकसभेच्या निकालाची आकडेवारी पाहता विरोधकांनी डॉ. हिना गावित यांच्याविरोधात मोट बांधल्याने पाडवी यांना एक लाख २५ हजार मते या मतदारसंघातून मिळाली होती. दुसरीकडे, गावित यांना सुमारे ८५ हजार मते मिळाली होती. आता गावित यांच्याविरुद्ध एकत्र येणारे सर्व विरोधक वेगवेगळे लढणार असल्याने त्यांच्या मताची विभागणी होऊन गावित यांना फायदा होऊ शकतो, असे गणित मांडले जात आहे. डॉ. हिना गावित यांनी मतदारसंघातील अक्कलकुवा शहरात एक तर, धडगाव शहरात एक घर वास्तव्यासाठी भाडेतत्वावर घेतली आहेत. त्यामुळे त्यांची विधानसभा निवडणूक लढण्याची संपूर्ण तयारी झाल्याचे मानले जात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com