चेतन व्यास
वर्धा : सततच्या पावसामुळे वर्धा जिल्ह्यातील प्रकल्पाच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. वर्धा शहरासह आजूबाजूच्या अकरा ग्रामपंचायतीला पाणी पुरवठा करणारा महाकाळी येथील धाम प्रकल्प शंभर टक्के भरला असून धरणातील पाणी ओसंडून वाहत आहे. यामुळे वर्धा शहराच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. काही महिन्यांपूर्वी या प्रकल्पाची एका भागाकडून उंची वाढविण्यात आली होती. नदीत विसर्ग सुरू झाल्याने काचनूर, खरांगणा, आंजी, मोरांगणा या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
मागील सहा दिवसांपासून (Wardha) जिल्ह्यात पावसाने कहर केला आहे. संततधार पावसामुळे जिल्ह्यातील छोटे आणि मोठ्या प्रकल्पांसह नाले देखील भरले आहेत. महाकाली येथील धाम नदी प्रकल्प १०० टक्के भरला असून नदीकाठच्या गावातील नागरिकांना सतर्कतेच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. धनोडी येथील निम्न वर्धा प्रकल्पाचे ३ दरवाजे ५० सेमीने उघडण्यात आले असून वर्धा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तर देवळी तालुक्यात आठवडाभरापासून सुरू असलेल्या संततधार (Heavy Rain) पावसामुळे नदी पात्र दुथडी भरून वाहत आहे. सरूळ, अलमडोह, निमसडा, आलोडा, डिगडोह गावाचा संपर्क तुटला आहे.
तसेच घोडेगाव येथील नाल्याला आलेल्या पाण्यामुळे सेंद्री सोनोरा या गावाचा संपर्क तुटला आहे. नांद प्रकल्पाचे पाच दरवाजे २५ से.मी. ने उघडले असून धरणातील पाणी वणा नदीपात्रात सोडण्यात येत आहे. कारंजा (घाडगे) तालुक्यातील एकमेव असलेले कार नदी प्रकल्प सुद्धा ओव्हरफ्लो झाला आहे. धरण १०० टक्के भरल्याने तालुक्यातील पिण्याच्या पाण्यासह ओलिताचा प्रश्न सुटला आहे. कार धरण पहिल्या पावसात ओव्हरफ्लो झाल्याने पर्यटक याठिकाणी गर्दी केली जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.