Bhiwandi Rain : मुसळधार पावसाने भिवंडी शहरात सर्वत्र पाणी; विद्यार्थ्यांना करावी लागतेय कसरत

Bhiwandi news : भिवंडी शहर व परिसरात रात्रीपासून जोरदार पाऊस सुरु झाला होता. सकाळी पावसाचा जोर कमी झाला होता.
Bhiwandi Rain
Bhiwandi Rain Saam tv
Published On

फय्याज शेख 
भिवंडी
: राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस होत आहे. यात मुंबई परिसरात देखील सकाळपासून जोरदार पाऊस सुरु असून भिवंडी शहर व ग्रामीण भागात देखील रात्रीपासून सुरू झालेल्या पावसाची संतधार गुरुवारी सुद्धा सुरू राहिली. रात्रीपासून पडत असलेल्या जोरदार पावसामुळे भिवंडी शहरात सगळीकडे पाणीच पाणी झाले आहे. यामुळे वाहने देखील अडकून पडल्याचे पाहण्यास मिळत आहे. 

Bhiwandi Rain
Sambhajinagar Crime : सहा महिन्यात १०६ मुली बेपत्ता; संभाजीनगर शहरातील धक्कादायक चित्र

भिवंडी (Bhiwandi) शहर व परिसरात रात्रीपासून जोरदार पाऊस सुरु झाला होता. सकाळी पावसाचा जोर कमी झाला होता. परंतु दुपारनंतर पुन्हा पावसाचा जोर वाढला आणि त्यानंतर भिवंडी शहरातील भाजी मार्केट, तीन पत्ती बाजारपेठ, कमला हॉटेल, कल्याण नाका, देवजी नगर आदी सकल भागात पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साचले होते. तीन बत्ती मंगळबाजार ठिकाणी रस्त्यावरील चेंबरचे झाकण पावसाच्या (Rain) पाण्याने उडून गेल्यानं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नाल्यातील पाणी रस्त्यावर येत होतं आणि त्यामुळेच त्या ठिकाणी पालिका आपत्कालीन कक्षातील कर्मचाऱ्यांनी विशेष दक्षता घेत खबरदारी घेतली.  

Bhiwandi Rain
Wardha News : अनेक गावातील पाणी पुरवठ्याचे स्रोत पुरामुळे दूषित; टँकरने पाणीपुरवठा करण्याबाबत आमदार कांबळे यांच्या सूचना

भिवंडी शहरात ठाणे जिल्हा परिषद शिक्षण मंडळ संपूर्ण जिल्ह्यातील माध्यमिक प्राथमिक शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. यानंतर दुपारी घरी परतणाऱ्या विद्यार्थ्यांना साचलेल्या पाण्याचा साचलेल्या पाण्यातून वाट काढावी लागली. या ठिकाणी पालिकेच्या आपत्कालीन कक्षाने बांधलेल्या रस्सीच्या मदतीने रोड क्रॉसिंग करताना कर्मचारी व स्थानिक नागरिक दिसले तर परिसरात दुकानांमध्ये पाणी गेले होते. शिवाय काही वाहने देखील पाण्यात अडकली होती. 

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com