Wardha News: विद्यार्थिनीशी अश्लील चाळे; त्‍या गुरुजीविरुद्ध दोन वर्षांनी गुन्हा दाखल

विद्यार्थिनीशी अश्लील चाळे; त्‍या गुरुजीविरुद्ध दोन वर्षांनी गुन्हा दाखल
Wardha News
Wardha NewsSaam tv
Published On

चेतन व्यास

वर्धा : अल्पवयीन विद्यार्थिनीला वर्गखोलीत बोलावून तिच्याशी अश्लील चाळे केले. या गुरुजीविरुद्ध (Teacher) अखेर मुख्याध्यापकांच्या तक्रारीवरून विनयभंगासह पोक्सो कायद्यांतर्गत देवळी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी गुरुजीचा शोध पोलिसांकडून (Police) सुरू असून लवकरच त्याला अटक करण्यात येईल. (Maharashtra News)

Wardha News
Nashik News: गतवर्षी कोरोनात आत्याचा मृत्यू; डॉक्टरच जबाबदार असल्याच्या रागातून भाच्याकडून हल्ला

देवळी पोलिस (Wardha News) ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या एका गावातील शाळेत १ जुलै ते २१ नोव्हेंबर २०१९ या सत्रात १३ वर्षीय विद्यार्थिनी चौथ्या वर्गाचे शिक्षण घेत होती. शाळेत कार्यरत वर्ध्यातील बोरगाव मेघे परिसरातील रहिवासी शिक्षक अरविंद बी. कांबळे याने पीडितेला वर्गखोलीत बोलावून तिच्याशी अश्लील चाळे केले. ही बाब पीडितेने तिच्या आई आणि आत्याला सांगितली होती. घरच्यांनी ही बाब मुख्याध्यापकांच्या निदर्शनास आणून दिली.

दोन वर्षाने गुन्‍हा दाखल

या प्रकरणात गट शिक्षणाधिकाऱ्यांकडून चौकशी सुरू झाली. तक्रार होताच २०१९ मध्येच गुरुजी अरविंद कांबळे याला निलंबित करून चौकशी समिती गठित करण्यात आली होती. चौकशीत लंपट गुरुजी अरविंद कांबळे हा दोषी आढळून आल्याने अखेर मुख्याध्यापकाने दिलेल्या तक्रारीनुसार दोन वर्षांनी २८ डिसेंबरला आरोपी अरविंद कांबळे याच्याविरुद्ध देवळी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com