तरबेज शेख
नाशिक : ऑक्टोबर २०२१ मध्ये कोरोना काळात नाशिकच्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना महिलेचा मृत्यू (Death) झाला. आपल्या आत्याच्या मृत्यूला डॉक्टर (Doctor) जबाबदार असल्याचा राग मनात धरून भाच्याने डॉक्टरावर जीवघेणा हल्ला केला. (Tajya Batmya)
कोरोना काळात मयत (Corona Death) पावलेल्या आत्याचा भाचा संशयित अभिषेक शिंदे याने दोघा साथीदारांसोबत राष्ट्रवादीचे दिवंगत नेते यांची कन्या डॉ. प्राची पवार यांच्यावर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक माहिती पोलीस (Police) तपासात समोर आली आहे. संशयित अभिषेक याने गुन्ह्यात सहभागी दोघा मित्रांना प्रत्येकी १० हजार रुपये देण्याचे कबूल केले होते.
दुचाकी आडवी लावून केला हल्ला
डॉ. प्राची पवार हल्ला प्रकरणात पोलिसांनी मुख्य सूत्रधार संशयित अभिषेक दीपक शिंदे, पवन रमेश सोनवणे, धनंजय भवरे या तिघांना नाशिक ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. १९ डिसेंबरला गंगापूर रोड गोवर्धन शिवारातील पवार हाऊस परिसरात येऊन गेटवर डॉ. प्राची पवार यांच्या कारला दुचाकी आडवी लावत गाडी बंद असल्याचा बहाणा केला. तसेच डॉ. प्राची पवार यांच्याशी वाद घालत संशयित तिघांनी डॉ. पवार यांच्यावर धार धार शस्त्राने जीवघेणा हल्ला केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. सध्या डॉ.प्राची पवार यांची प्रकृती स्थिर आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.