स्वातंत्र्यदिनी भीषण अपघात! ट्रॅव्हल्सच्या धडकेत ३ शाळकरी मुलींचा शाळेबाहेर मृत्यू; महाराष्ट्रावर शोककळा

Wardha Hinganghat Accident Death : स्वातंत्र्यदिनी वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाटमध्ये भीषण अपघात झाला. भरधाव ट्रॅव्हल्स बसने दुचाकीला धडक दिल्याने तीन शाळकरी मुली गंभीर जखमी झाल्या आणि उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
Wardha Hinganghat Accident Death
Wardha Hinganghat Accident DeathSaam TV (AI)
Published On

चेतन व्यास, वर्धा प्रतिनिधी

three schoolgirls killed in Hinganghat road accident : संपूर्ण देश आज ८० व्या स्वातंत्र्यदिनाचा उत्साह साजरा करत असतानाच महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट शहरातून एक अत्यंत काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. हिंगणघाट शहरातील आंबेडकर शाळेजवळ एका भरधाव ट्रॅव्हल्सने दुचाकीला मागून जोरदार धडक दिली.

या भीषण अपघातात दुचाकीवरून जाणाऱ्या तीन अल्पवयीन मुलींचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. स्वातंत्र्यदिनाच्या दिवशीच हिंगणघाट शहरावर भीषण शोककळा पसरली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, समृद्धी धामसे, आरुही चवरे आणि मिसबा शेख अशी अपघातात मृत्यू झालेल्या शाळकरी मुलींची नावे आहेत.

Wardha Hinganghat Accident Death
PM Modi : स्वातंत्र्यदिनी मोदींचे देशातील तरुणांना मोठे गिफ्ट! आतापर्यंतची सर्वात मोठी घोषणा

उपचारादरम्यान तिन्ही मुलींची प्राणज्योत मालवली

समृद्धी धामसे, आरुही चवरे आणि मिसबा शेख या तिन्ही मुली दुचाकीवरून स्वातंत्र्यदिनासाठी जात होत्या, त्याचवेळी आंबेडकर शाळेजवळ मागून येणाऱ्या भरधाव खासगी ट्रॅव्हल्स बसने दोरात धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की धडक बसताच तिन्ही मुली रस्त्यावर फेकल्या गेल्या अन् गंभीर जखमी झाल्या. स्थानिक नागरिकांनी प्रसंगावधान राखून जखमी मुलींना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान या तिन्ही निष्पाप मुलींची प्राणज्योत मालवली. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

Wardha Hinganghat Accident Death
महानगर गॅसचा ग्राहकांना मोठा इशारा! व्हॉट्सॲपवर आलेली 'ही' फाईल चुकूनही डाऊनलोड करू नका

स्वातंत्र्यदिनाच्या उत्साहातच तीन चिमुकल्या मुलींचा अपघातात मृत्यू झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरताच हिंगणघाट शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तातडीने अपघातस्थळी धाव घेतली असून, वाहतूक सुरळीत केली आहे. याप्रकरणी अपघातास कारणीभूत ठरलेल्या ट्रॅव्हल्स चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, पोलीस घटनेचा पुढील सविस्तर तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com