Walmik Karad : वाल्मिक कराडची कारागृहात रवानगी; समर्थकाचा आत्मदहनाचा प्रयत्न, बीडमध्ये नेमकं काय घडतंय?

Walmik Karad News : वाल्मिक कराडची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. वाल्मिकची रवानगी केल्यानंतर तुरुंगात रवानगी झाल्यानंतर समर्थकाने आत्मदहनाचा प्रयत्न केला. बीडमध्ये नेमकं काय घडतंय? जाणून घेऊयात.
Walmik Karad
Walmik Karad News Saam tv
Published On

Walmik Karad News : संतोष देशमुख प्रकरणात वाल्मिक कराडचा पाय आणखी खोलात गेला आहे. दिवसेंदिवस वाल्मिक कराड आणखी गोत्यात अडकू लागला आहे. आज केज कोर्टात वाल्मिक कराडला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्यानंतर वाल्मिक कराडची बीडची जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. तर दुसरीकडे वाल्मिक कराड समर्थकाने आत्मदहनाचा प्रयत्न केला. या प्रकरणाने बीडमधील वातावरण पेटलं आहे.

Walmik Karad
Walmik Karad : वाल्मिक कराडला मकोका लागताच परळीत वातावरण तापलं; बसवर दगडफेक, सर्व गाड्यांच्या फेऱ्या रद्द

केज कोर्टातून न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर वाल्मिक कराडची त्याची रवानगी जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. संतोष देशमुख खंडणी प्रकरणात वाल्मिक कराडला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळाली आहे. त्याचबरोबर कराडवर मकोका देखील लावण्यात आला आहे. मकोका लावल्यानंतर वाल्मिक कराडच्या अडचणीत भर पडली आहे.

Walmik Karad
Walmik Karad : वाल्मिक कराडचा फास आवळला जाणार? मोठी अपडेट आली समोर | Video

आजची रात्र वाल्मिक कराड याला बीड जिल्हा कारागृहात काढावी लागणार आहे. त्यानंतर उद्या एसआयटीकडून वाल्मिक कराड याला पुन्हा न्यायलात हजर करण्यात येणार आहे. त्याचबरोबर एसआयटी उद्या वाल्मिक कराड याची पोलीस कोठडी मागणार आहे. त्यामुळं आजची रात्र वाल्मिक कराड याला जेलमध्ये काढावी लागणार आहे.

Walmik Karad
Walmik karad : खोटा गुन्हा मागे घ्या, वाल्मीक कराडच्या ७५ वर्षीय आईनेच पोलिस ठाण्यासमोर मांडला ठिय्या

समर्थकाकडून आत्मदहनाचा प्रयत्न

दरम्यान, वाल्मिक कराडला मकोका लागल्यानंतर त्याच्या समर्थकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. काही आंदोलकांनी पेट्रोल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला. तर वाल्मिक कराडची आता जिल्हा कारागृहात रवानगी होणार आहे. त्यावेळी एका समर्थकाने आत्मदहनाचा प्रयत्न केला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. बीड जिल्हा कारागृहाजवळ मोठा जमाव जमला आहे. त्यातील एका समर्थकाला हृदय विकाराचा झटका देखील आला. त्यालाही तातडने रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

बीड जिल्हा कारागृहाजवळ वाल्मिक कराडची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. त्यावेळी जमलेला वाल्मिक कराडचा एक समर्थक चक्कर येऊन पडला. या समर्थकाला हृदयविकाराचा झटका आल्याची प्राथमिक माहिती आहे. एजाज खान असे समर्थकाचे नाव आहे. या समर्थकावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com