
बीड : संतोष देशमुख प्रकरणाने बीड धुमसत आहे. संतोष देशमुख प्रकरणात वाल्मिक कराडला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. तसेच त्याच्यावर मकोका देखील लावण्यात आला आहे. वाल्मिक कराडवर मकोका लावल्यानंतर परळीत वातावरण तापलं आहे. परळीत अचानक बंदची हाक देण्यात आली आहे. काही भागात बसवर दगडफेक देखील करण्यात आली आहे. यामुळे शहरात तणावपूर्ण वातावरण पाहायला मिळत आहे.
परळीत वाल्मीक कराड समर्थकांनी सकाळपासून आक्रमक भूमिका घेतली आहे. परळीत कराडच्या समर्थनात निदर्शने करण्यास सुरुवात केली आहे. परळीत एका महिलने स्वत:ला पेटवण्याचा देखील प्रयत्न केला. वाल्मीक कराडची ७५ वर्षीय आई आणि बायकोही सहभागी झाली. या प्रकरणावरून सकाळपासूनच वातावरण तापलेलं पाहायला मिळत आहे.
परळीत काही ठिकाणी कराडच्या समर्थकांनी आमदार सुरेश धस आणि संदीप क्षीरसागर यांच्या पोस्टरवरही चप्पल मारत रोष व्यक्त केला. काही कराड समर्थकांनी टायर देखील पेटवले आहेत. तर बीड जिल्ह्यात जमाव बंदीचे आदेश दिले असतानाही आंदोलन सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. काही समर्थकांनी टायर पेटवल्यानंतर पोलिसांनी टायर विझविले.
परळीत कौडगाव बसवर अज्ञातांकडूनही दगडफेक करण्यात आली. परळीत डेपोतून अचानक जाणाऱ्या सर्व गाड्यांच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव डेपोमध्ये बस लावल्या आहेत. या दगडफेकीमुळे परळीमध्ये तणावपूर्ण वातावरण पाहायला मिळत आहे.
वाल्मिकला आज १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. आज कराला केज कोर्टात हजर करण्यात आल्यानंतर त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. तसेच त्याला मकोका देखील लावण्यात आला. त्याच्यावर मकोका लावण्यात आल्यानंतर त्याच्या समर्थकांनी परळीत आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी टायर जाळत रोष व्यक्त केला.
वाल्मिक कराडसाठी त्याची आई देखील मैदानात उतरली. वाल्मिक कराडच्या आईने परळी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या केला. मात्र, काही वेळानंतर वाल्मिकच्या आईला चक्कर आल्याचही पाहायला मिळालं. तर वाल्मिकच्या बायकोनेही गंभीर आरोप केले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.