Parali Crime : अपहरण करून खंडणी घेणारे ५ जण पोलिसांच्या ताब्यात; १७ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

Beed News : बीडच्या परळी येथील व्यापारी अमोल दुबे यांची एक एजन्सी आहे. दरम्यान काम आटपून घरी जात असताना त्यांना पाच जणांनी अडवले. तसेच दुबे यांना मारहाण करून त्यांचे अपहरण करण्यात आले.
Parali Crime
Parali CrimeSaam tv
Published On

बीड : बीड जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न नागपूर येथील अधिवेशनात गाजत असतानाच दुसरीकडे बीडच्या परळी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. परळीतील व्यापारी अमोल डूबे अपहरण आणि खंडणी प्रकरणातील आरोपींना परळी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून सुमारे १७ लाख १२ हजाराचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

बीडच्या परळी येथील व्यापारी अमोल दुबे यांची एक एजन्सी आहे. दरम्यान काम आटपून घरी जात असताना त्यांना पाच जणांनी अडवले. तसेच दुबे यांना मारहाण करून त्यांचे अपहरण करण्यात आले. यानंतर अपहरण करणार्यांनी दोन कोटी रुपयांची मागणी केली होती. दरम्यान त्यांनी विनंती करून तीन लाख ८७ हजार रुपये रोख आणि दहा तोळे सोने देऊन आपली सुटका करून घेतली होती. या प्रकरणी बीड जिल्ह्यात खळबळ उडाली होती. या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरु असताना पाच जणांना ताब्यात घेतले आहे. 

Parali Crime
Dog Bites : १० महिन्यात १८ हजार जणांचे तोडले लचके, कल्याण- डोंबिवलीत भटक्या कुत्र्यांची दहशत

पाचजण ताब्यात 
परळी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींमध्ये चैतन्य पंढरी उमाप (वय २४), सागर उर्फ बबलू शंभू सूर्यवंशी (वय २२), शंकर भगवान जोगदंड (वय २२), सचिन श्रीराम जोगदंड (वय २५) हे चारही आरोपी अंबाजोगाई शहरातील परळीवेस येथे राहतात. तर यातील मुख्य मास्टर माईंड जय उर्फ सोनू संजय कसबे (वय २६) हा परळी शहरात वास्तव्यास आहे. 

Parali Crime
Beed Municipal Corporation : अनधिकृत बॅनर लावणाऱ्यांना दणका; नगरपालिकेकडून २१ जणांविरोधात गुन्हा दाखल

१७ लाखाचा मुद्देमाल हस्तगत 

परळी पोलिसांनी आरोपींना जेरबंद करत त्यांच्याकडील २ कारसह सोन्याची चैन, सोन्याची बिस्किट, रोख रक्कम, गावठी कट्टा असा तब्बल १७ लाख १२ हजारांचा मुद्देमाल देखील जप्त करण्यात आला आहे. दरम्यान या खंडणी प्रकरणात सर्व आरोपी 20 ते 26 वयोगटातील असल्याने बीडची तरुणाई गुन्हेगारीच्या विख्यात अडकलीय आहे का? असा सवाल समोर येत आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com