Beed Municipal Corporation : अनधिकृत बॅनर लावणाऱ्यांना दणका; नगरपालिकेकडून २१ जणांविरोधात गुन्हा दाखल

Beed News : छत्रपती शिवाजी महाराज चौकात लावण्यात आलेल्या बॅनरमुळे वाहतुकीस अडथळा व अपघाताच्या घटना घडलेल्या आहेत. यामुळे आता नगरपालिका प्रशासन अनधिकृत बॅनर लावणाऱ्या विरोधात ॲक्शन मोडमध्ये आले आहे.
Beed Municipal Corporation
Beed Municipal CorporationSaam tv
Published On

बीड : बीड शहरात जाहिरात किंवा शुभेच्छापर बॅनर लावण्यात आले आहेत. मात्र बॅनर लावण्यापूर्वी नगरपालिकेची परवानगी घेण्यात आली नसून अनधिकृत बॅनर लावणाऱ्यांना बीड नगरपालिकेने चांगलाच दणका दिला आहे. नगरपालिकेच्या मुख्याधिकारी नीता अंधारे यांच्या आदेशावरून व नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या फिर्यादीवरून बीड शहरातील विविध पोलीस ठाण्यात तब्बल २१ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बीड शहरात राजकीय नेते, कार्यकर्ते, व्यावसायिक आदिंनी आपापल्या वेगवेगळ्या जाहिरातीचे अनधिकृत बॅनर लावून सुंदर शहराला विद्रूप केले होते. तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौकात लावण्यात आलेल्या बॅनरमुळे वाहतुकीस अडथळा व अपघाताच्या घटना घडलेल्या आहेत. यामुळे आता नगरपालिका प्रशासन अनधिकृत बॅनर लावणाऱ्या विरोधात ॲक्शन मोडमध्ये आले आहे.

Beed Municipal Corporation
Mahayuti Goverment : सांगली जिल्ह्याला मंत्रीपद डावलल्याने महायुती सरकार विरोधात नाराजी; विरोधी पक्षाकडून आमदारांच्या राजीनाम्याची मागणी

परवानगी घेणे आवश्यक 

शहर हद्द परिसरात कोठेही बॅनर लावायचे झाल्यास पालिकेची परवानगी घेणे आवश्यक आहे. मात्र अनेकजण नियमांची पायमल्ली करत परवानगी न घेताच शुभेच्छा देणारे बॅनर शहरात ठिकठिकाणी लावत असतात. त्यानुसार बीड शहरात देखील बॅनर लावल्याचे पाहण्यास मिळत आहे. अशा पद्धतीने अनधिकृत लावलेले बॅनर काढण्याचे काम नगरपालिकेकडून करण्यात येत आहे. 

Beed Municipal Corporation
Dog Bites : १० महिन्यात १८ हजार जणांचे तोडले लचके, कल्याण- डोंबिवलीत भटक्या कुत्र्यांची दहशत

२१ जणांवर गुन्हा दाखल 
बीड नगरपालिकेचे स्वच्छता निरीक्षक शशिकांत जोगदंड यांच्या फिर्यादीवरून शिवाजीनगर पोलिस ठाण्यात सुदर्शन सुभाष बांगर, उमेश शहादेव फड, यादव चव्हाण, संकेत जाधव, सुमित उजगरे, जालिंदर हिरवे, दिपक चांदणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. तर सुनिल काळकुटे यांच्या फिर्यादीवरून पेठ बीड पोलिस ठाण्यात संकेत जाधव, रोहन गायकवाड, विलास जोगदंड यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. तर भागवत जाधव यांच्या फिर्यादीवरून बीड शहर पोलीस ठाण्यात संकेत जाधव, दत्ता पगळ, अक्षय चांदणे, सुमित उजगरे, पंकज खुपसे, अक्षय चांदणे, अजय सुरवसे, राहुल इंगळे, जालिंदर हिरवे, दीपक चांदणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com