Nagpur: नागपुरातही मतदार यादीत घोळ; एकाच घराच्या पत्त्यावर 190 मतदारांच्या नावाची नोंद

Nagpur Voters Controversy: नागपूरमध्ये एकाच घराच्या पत्त्यावर तब्बल 190 मतदारांच्या नावाची नोंद झाली. मात्र एकाच घरात 190 जणांची नोंद कशी झाली? स्थानिक नेत्यांचा नेमका आरोप काय आहे? नागपूरमधील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी नेमकं काय सांगितलं? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून.
Nagpur Voters Controversy
One house, 190 voters! Nagpur’s Vanadongri area under scrutiny after shocking voter list irregularity.saam tv
Published On
Summary
  • एका घराच्या पत्त्यावर 190 मतदारांची नोंद झाल्याचा धक्कादायक प्रकार

  • वानाडोंगरी नगर परिषद क्षेत्रातील मतदार यादीतील या त्रुटीमुळे प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण झालेत.

  • स्थानिक नेत्यांनी मतदारसंघात मतदार वाढवण्याचा आरोप केला आहे.

ऐकलतं एकाच घराच्या पत्त्यावर तब्बल 190 मतदारांची नोंद आढळलीय. हा प्रकार घडलाय, नागपूरमधील हिंगणा मतदारसंघातील वानाडोंगरी नगर परिषद क्षेत्रात. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निव़डणुकीसाठी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाली. आणि एकाच घरावर 190 मतदारांची नोंद कशी झाली? असा सवाल स्थानिक मतदार आणि नेत्यांनी उपस्थित केला.

दुसरीकडे ज्या मतदारांची नावं या लिस्टमध्ये आहेत. त्या मतदारांना आमच्या प्रतिनिधीनं शोधण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी यातील काही मतदार 20 ते 25 वर्षांपासूनयाठिकाणी राहत असल्याचं पाहायाला मिळालं. तर मग मतदार ओळखपत्र, आधार कार्ड असून हे मतदार बोगस कसे असा सवालही उपस्थित केला जातोय.

Nagpur Voters Controversy
शिक्षक की सावकार? गुरुजी आयटीच्या रडारवर, हजारो शिक्षकांची 'ITR'मधील चलाखी

दरम्यान एकाच घर क्रमांकावर 190 मतदाराची नोंद असल्याचा आरोप होतं असल्यानं आम्ही प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून याबद्दल अधिक माहिती जाणून घेतली. त्यावेळी ज्यांची घरे अतिक्रमण ठिकाणी असतात किंवा ज्यांचा पत्ता स्थायी नसतो त्यांना 'शून्य एक' हा घर क्रमांक देण्यात येतो. तसेच हा घर क्रमांक मालमत्ता क्रमांक नाही, असं प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सांगितलंय.

Nagpur Voters Controversy
Nashik Guardian Minister: डोनाल्ड ट्रम्प सोडवणार नशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद; भुजबळ,भुसे की महाजन? कोणाला मिळेल संधी

एकूणच मतदार यादीतील अनेक मतदारांचे पत्ते घर क्रमांक 1 देण्यात आल्यानं हा घोळ झाल्याचं समोर येतंय.मात्र यामुळे मतदार यादीवरील आक्षेप वाढताना दिसतोय. राहुल गांधींनीही महादेवपुरा मतदारसंघातील मतदार यादीतील पत्त्त्याच्या शुन्य, एक, अशा चिन्हांवर आक्षेप घेत. हे पत्ते पडताळणी करण्यासारखे नाहीत, असा आरोप केला होता. तसाच प्रकार नागपूरच्या हिंगणा मतदारसंघात समोर आल्यामुळे आता या प्रकरणी चौकशीची मागणी होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com