
नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून वाद पेटला आहे.
हा वाद सोडवण्यासाठी “डोनाल्ड ट्रम्प”ची मदत घ्यायची वेळ आली आहे.
ट्रम्पचं नाव घेऊन या वादात हास्याची जोड देण्यात आल्यानं सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलाय.
राज्य सरकारपुढील नाशिक आणि राडगडमधील पालकमंत्री पदाचा वाद अजूनही कायम आहे. दोन देशामधील तणावापेक्षा हा वाद अत्यंत गुंतागुतीचा बनलाय. त्यामुळे आता हा वाद आता राज्य सरकार किंवा केंद्र सरकार सोडवणार नाहीत. आता नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद आंतरराष्ट्रीय वर सोडवला जाणार असून त्याचा निर्णय डोनाल्ड ट्रम्प घेणार आहेत. भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस की शिवसेना आता ट्रम्प कोणाला झुकत माफ देणार हे पाहावं लागेल.
दरम्यान नोबल जिंकण्याची संधी गमावलेल्या अमेरिकन राष्ट्राध्यक्षांकडे पालकमंत्री पदाचा वाद सोडवण्याची नामी संधी आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात कधी आणि कशी कुणाची इंट्री हुईल सांगता येत नाही. आता थेट डोनाल्ड ट्रम्प यांची राज्याच्या राजकारणात एंट्री झालीय. पालकमंत्रिपदावरून भाजप नेते गिरीश महाजन आणि दादा भुसे यांच्यात कलगीतुरा रंगला होता.
त्यावेळी दादा भुसे यांनी पालकमंत्री पदाचा निर्णय घेण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे जावे लागेल, असं मिश्कील विधान केलं होतं. यावर प्रत्युत्तर देताना महाजन म्हणाले, भुसे यांच्या म्हणण्यानुसार डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांचे कदाचित घनिष्ट संबंध असतील. त्यामुळे ते ट्रम्प यांना पालकमंत्रिपदाचा तिढा सोडविण्याची विनंती करतील.
त्यावरून आता छगन भुजबळ यांनी उपरोधिक टोला मारलाय. त्यासाठी मी इतक्या लांब मी जाऊ शकत नाही. मी छोटा माणूस आहे. मी जास्ती जास्त उपमुख्यमंत्री अजित पवार, मुख्यमंत्री, एकनाथ शिंदे यांच्याकडे जाईन. त्याहूनही फार फार पंतप्रधान मोदींकडे हा प्रश्न मांडेन असं भुजबळ म्हणालेत.
राज्यात महायुतीचं सरकार आले तेव्हा पालकमंत्र्याच्या याद्या ठरल्या. नाशिकची माळ पडली गिरीश महाजन यांच्या गळ्यात. त्यावेळी दादा भुसे नाराज झाले होते, आता कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्रिपदाला विशेष महत्त्व आलंय. या पदासाठी भाजपचे गिरीश महाजन, शिंदे गटाचे दादा भुसे, राष्ट्रवादीचे छगन भुजबळ, माणिकराव कोकाटे हे चारही नेते नाशिकच्या पालकमंत्रिपदाच्या शर्यतीत आहेत. दरम्यान तिढा न सुटल्यामुळे चारही मंत्र्यांना कुंभमेळा मंत्री समितीत स्थान देण्यात आलंय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.