Virar Crime News: बाजारात भररस्त्यामध्ये व्यवसायिकावर अ‍ॅसिड हल्ला; हल्लेखोर फरार

त्यांच्या मानेला गंभीर दुखापत झाली आहे. विरार पोलीस फरार झालेल्या दोन अज्ञात हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.
Nandurbar Crime News
Nandurbar Crime NewsSaam tv
Published On

Virar News: विरारमध्ये एका व्यावसायिकावर ऍसिड हल्ला झाल्याची घटना उघडकीस आली आहे. मोबीन शेख असे हल्ला झालेल्या व्यक्तीचे नाव असून या हल्ल्यात ते थोडक्यात बचावले आहेत. त्यांच्या मानेला गंभीर दुखापत झाली आहे. विरार पोलीस फरार झालेल्या दोन अज्ञात हल्लेखोरांचा शोध घेत आहेत. (Latest Crime News)

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, मोबीन शेख (४२) हे विरार येथील गोपचर पाडा येथे राहतात. त्यांचा एलईडी दिव्यांचा व्यवसाय आहे. शनिवारी रात्री साडेआठच्या सुमारास ते आपल्या घरातून बाजारात निघाले होते. ते स्कुटीवर विरार पूर्वेच्या मकवाना रुग्णालयासमोरून जात असताना दोन इसमानी त्यांच्यावर ऍसिड असलेली प्लास्टिकची पिशवी फेकली.

Nandurbar Crime News
Nalasopara Crime News: दुचाकीचा धक्का लागल्याने राग अनावर, तिघांकडून तरुणाला बेदम मारहाण; पुढं घडलं भयानक

हा हल्ला चुकवण्यासाठी मोबीन खाली वाकले. मात्र ऍसिडची पिशवी त्यांच्या मानेला लागली. त्यांना ताबडतोब रुग्णालयात दाखल करण्यात आले. या हल्ल्यामध्ये त्यांच्या मानेला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या प्रकरणी विरार पोलीस ठाण्यात दोन अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हल्लेखोर कोण आहेत हे स्पष्ट झालेले नाही. अज्ञात हल्लेखोरांचा शोध सुरू असलयाची माहिती विरार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांनी दिली.

Nandurbar Crime News
Mumbai Crime News: धक्कादायक! मसाजचे आमिष अन् बंदुकीचा धाक दाखवून एकाला लुटले; २ तासात आरोपी अटकेत

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com