Nalasopara Crime News: दुचाकीचा धक्का लागल्याने राग अनावर, तिघांकडून तरुणाला बेदम मारहाण; पुढं घडलं भयानक

Nalasopara News Today: दुचाकीच्या आरशाच्या धक्का लागल्याने झालेल्या वादातून एका तरुणाची भरदिवसा हत्या करण्यात आली.
Nalasopara Crime News
Nalasopara Crime NewsSaam TV

Nalasopara Crime News: गेल्या काही दिवसांपासून राज्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. शुल्लक कारणावरून खूनांसारखे गंभीर गुन्हे घडत आहेत. अशीच एक घटना नालासोपारा येथून समोर आली आहे. दुचाकीच्या आरशाच्या धक्का लागल्याने झालेल्या वादातून एका तरुणाची भरदिवसा हत्या करण्यात आली.

नालासोपारा (Nalasopara) उड्डाणपूलावर रविवारी संध्याकाळी सव्वा चारच्या सुमारास ही घटना घडली. हत्या करणारे तिन्ही आरोप फरार झाले असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

Nalasopara Crime News
Rain Updates: उत्तर भारतात पावसाचं थैमान; विविध घटनांमध्ये १९ जणांचा मृत्यू, शाळा-कॉलेजांना सुट्टी जाहीर

रोहित यादव (वय २० वर्ष) असं हत्या झालेल्या (Crime News) तरुणाचं नाव असून तो नालासोपारा पुर्वेच्या संतोष भुवन येथी रहिवाशी होता. मिळालेल्या माहितीनुसार, रोहित आणि त्याचा मित्र विवेक हे रविवारी सायंकाळच्या सुमारास दुचाकीवरून नालासोपारा पूर्वेला जात होते.

नालासोपारा उड्डाणपूलावरून जात असताना त्यांच्या दुचाकाने दुसर्‍या एका दुचाकीला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला.या प्रयत्नात त्यांच्या दुचाकीचा धक्कादुसर्‍या दुचाकीच्या आरशाला लागला. दरम्यान, दुचाकीवर असलेल्या तिन्ही तरुणांनी रोहित आणि त्याच्या मित्राला मारहाण करण्यास सुरूवात केली.

Nalasopara Crime News
Mumbai Crime News : पैसे मागितल्याच्या रागातून बांबूने बेदम मारहाण, पीडित व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू

दिवसाढवळ्या हा प्रकार सुरू असताना कुणी मध्ये पडले नाही. या मारहाणीत रोहीत यादव याला गंभीर दुखापत झाली. त्याला तातडीने नालासोपारा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला.

याप्रकरणी नालासोपारा पोलीस (Police) ठाण्यात तीन अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. दुचाकी ओव्हरटेक करताना मयताच्या दुचाकीचा धक्का आरोपींच्या दुचाकीला लागला. यावरून वाद होऊन त्याला मारहाण करण्यात आली होती, अशी माहिती नालासोपारा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास सुपे यांनी दिली.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com