Mumbai Crime News: धक्कादायक! मसाजचे आमिष अन् बंदुकीचा धाक दाखवून एकाला लुटले; २ तासात आरोपी अटकेत

आरोपींकडून नऊ मोबाईल, रोख रक्कम दहा हजार रुपये, एक गावठी कट्टा आणि तीन जिवंत काडतुसे ताब्यात घेतली आहेत.
Mumbai Crime News
Mumbai Crime NewsSaamtv
Published On

संजय गडदे, प्रतिनिधी...

Mumbai Crime News: मुंबईच्या सांताक्रुज पूर्वेकडील एका नागरिकाला मसाजचे आमीष दाखवून त्याला बाबा होम्स या हॉटेलमध्ये नेऊन बंदुकीचा धाक दाखवून लुटण्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकाराने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा तपास करत पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. (Crime News In Marathi)

Mumbai Crime News
Samruddhi Mahamarg Accident : 'समृद्धी'चं भयावह वास्तव; ७ महिन्यांत १००० अपघात, १०६ मृत्यू; तज्ज्ञांनी सांगितली कारणं

काय आहे संपूर्ण प्रकरण?

मिळालेल्या माहितीनुसार, काल सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास आरोपी निलेश याने तक्रारदार यांना मसाज करण्यासाठी बाबा होम्स या हॉटेलमध्ये नेले. त्या ठिकाणी निलेश आणि त्याच्या इतर साथीदारांनी तक्रारदार यांना बंदुकीचा धाक दाखवून त्यांच्या खिशातील रोख रक्कम आणि वेगवेगळ्या बँक खात्यातील असे मिळून 95 हजार रुपये लुटले.

या प्रकरणी तक्रारदार यांनी वाकोला पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी कलम ३९७,३९५,३८६ भादविसह ३, २५ भा. ह. का. अन्वये गुन्हा नोंद केला. पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारावर अंधेरी परिसरातून आरोपींना अटक केली. (Crime News)

Mumbai Crime News
Modi Govt Cabinet Expansion: मोठी बातमी! केंद्रीय मंत्रिमंडळाचा होणार विस्तार, शिंदे आणि अजित पवार गटाला मिळणार मंत्रिपदे?

निलेश शिवकुमार सरोज, (२४ वर्ष), विशाल राजेश सिंग (२० वर्षे), आदित्य उमाशंकर सरोज (१९ वर्षे), सुरेश रामकुमार सरोज (२१ वर्ष), कुलदीप शेशनाथ सिंग (२८वर्ष), सुरेश रामसिंग विश्वकर्मा,( ४६ वर्ष ) सपोनकुमार अश्विनीकुमार शीट (३८ वर्ष) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींकडून नऊ मोबाईल, रोख रक्कम दहा हजार रुपये, एक गावठी कट्टा आणि तीन जिवंत काडतुसे ताब्यात घेतली सध्या या आरोपीच्या टोळीने मुंबई शहरात आणखी कुठला पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये अशा प्रकारचा घटना केली आहे का या संदर्भात अधिक तपास वाकोला पोलीस करत आहे.... (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com