मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची अंतरवली सराटी गावात विराट सभा पार पडली. या सभेचे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. शिवराज माने याने हा फोटो टिपला आहे. या फोटोत सभेला आलेली अभुतपूर्व गर्दी पाहायला मिळत आहे.
फोटोत राईच्या दाण्यांपेक्षाही बारीक दिसणारी ही लोक आहेत. तब्बल 100 एकरच्या मैदानात पसरलेली ही लोक मनोज जरांगे पाटील यांच्या एका हाकेवर एकत्रित आले आहेत. यातल्या बहुतांश लोकांनी मनोज जरांगे पाटलांशी संवाद काय तर त्यांना साध पाहिलही नसेन. पण हा माणूस गेल्या कित्येक वर्षांपासून लांबणीवर पडलेला आरक्षण नावाचा प्रश्न निकाली काढू शकतो, म्हणून हा जनसागर एकत्र आलाय, असं सभेत जमलेल्या अनेक लोकांचं म्हणणं आहे.
या गर्दीनेच सरकारची झोप उडवलीये, याच गर्दीच्या बळावर मनोज जरांगे पाटलांनी सरकारला 10 दिवसांचं अल्टीमेटम दिलंय. याच गर्दीच्या भरवशावर मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ, अजित पवार, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांसारख्या मातब्बर नेत्यांना थेट शिंगावर घेतलंय.
गर्दीला जमवणं जितकं कठीण काम, त्याहीपेक्षा जास्त आलेल्या गर्दीला शांततेत घरी पाठवण्याचं आव्हानही मनोज जरांगे पाटील यांनी पेललंय. सभेला हा प्रतिसाद मिळावा, लोकांनी आपल्या हाकेला धावून यावं, म्हणून मनोज जरांगे पाटील यांनीही दौरा सुरु केला. (Latest Marathi News)
लोकांना लोकांमधला वाटणारा हा माणूस लोकांना आपलासा वाटला म्हणून लोकांनीही या मनोज जरांगे पाटलांच्या हाकेला चांगलाच प्रतिसाद दिल्याचं या गर्दीत स्पष्ट दिसतंय. दिल्लीचं तख्त हालवणाऱ्या मराठा समाजाचं नेतृत्व करण्याचा प्रयत्न अनेकांकडून झाला.
पण अनेकांना या ग्रिड इतकं यश मिळालेलं दिसून येतं नाही. मनोज जरांगे पाटलांनी ती किमया करून दाखवलीये का? आपला नेता निवडलाय का? आगामी काळात ही गर्दी जरांगे पाटील या नावाच्या एका नवीन नेतृत्वाला जन्म देईन का? हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.