Viral News : २२ नातवंडांच्या ८० वर्षीय आजोबांचं ठरलं लग्न; ५० वर्षीय महिलेसोबत विवाहबंधनात अडकले

Nanded 80 Years Old Man Marriage Viral Love Story : नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद येथे ८२ वर्षीय सेवानिवृत्त शिक्षकांनी ५० वर्षीय महिलेसोबत पुनर्विवाह केला आहे. परिसरात या अनोख्या विवाहाची चर्चा सुरू आहे.
Viral News : २२ नातवंडांच्या ८० वर्षीय आजोबांचं ठरलं लग्न; ५० वर्षीय महिलेसोबत विवाहबंधनात अडकले
Nanded 80 Years Old Man Marriage Viral Love Story Saam Tv
Published On
Summary
  • धर्माबादमध्ये ८२ वर्षीय शिक्षकांचा पुनर्विवाह

  • २२ नातवंडांचे आजोबा पुन्हा विवाहबद्ध

  • पत्नीच्या निधनानंतर घेतला निर्णय

  • ५० वर्षीय अमिनाबेगमसोबत मुस्लिम परंपरेनुसार विवाह

  • कुटुंबीयांच्या संमतीने निर्णय

वयाची ८० ओलांडली की, माणसं निवृत्तीच्या शांत आयुष्याचा विचार करतात. पण नांदेडच्या धर्माबादच्या एका आजोबांनी वयाला चक्क ठेंगा दाखवला आहे. तीन मुले, तीन सुना, तीन मुली, तीन जावई, आणि चक्क २२ नातवंडे असलेल्या ८२ वर्षीय सेवानिवृत्त शिक्षकाने ५० वर्षीय महिले सोबत विवाह केला.सध्या या अनोख्या विवाहाची चर्चा सुरू आहे.

या ८० वर्षीय वृद्ध नवरदेवाचे नाव चौधरी शेख हुसेन शेख अहमद असे आहे. ते मूळचे माहूरचे रहिवासी आहेत पण, नोकरीच्या निमित्ताने धर्माबादला आले. येथेच त्यांचा विवाह खादरबी हुसेन साहेब राहणार राहेर यांच्याशी झाला.उर्दू प्रायमरी स्कूल मध्ये प्राथमिक शिक्षक म्हणून पस्तीस वर्षे सेवा केली.

Viral News : २२ नातवंडांच्या ८० वर्षीय आजोबांचं ठरलं लग्न; ५० वर्षीय महिलेसोबत विवाहबंधनात अडकले
Akola : एका लग्नाची अजब गोष्ट! सोशल मीडियावर जुळल्या रेशीमगाठी, साडेतीन फूट नवरदेव आणि तीन फूट नवरीच्या लग्नाची सर्वत्र चर्चा

२२ वर्षांपूर्वी ते वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. धर्माबाद च्या वास्तव्यात त्यांना तीन मुले, तीन मुली, सुना,जावई आणि तब्बल २२ नातवंडे आहेत. त्यापैकी काही नातवांचेही लग्न झालेली आहेत. दरम्यान काळात खादरबी पत्नीचा दीड वर्षापूर्वी मृत्यू झाला. पत्नीच्या निधनानंतर ते एकटे पडले. मुलं आणि सुनां बरोबर राहत असले तरी मनात एकटेपणाची जाणीव होती. त्यांना साथीदार हवा याची जाणीव होऊ लागली.

Viral News : २२ नातवंडांच्या ८० वर्षीय आजोबांचं ठरलं लग्न; ५० वर्षीय महिलेसोबत विवाहबंधनात अडकले
Maharashtra Politics : महापौर निवडणुकीआधी भिवंडीत मोठी घडामोड, भाजपच्या नाराज नगरसेवकांना शिवसेनेकडून फोडण्याचे प्रयत्न

आपल्यासाठी स्वतःच नव वधुचा शोध घेणे त्यांनी सुरू केले. तेलंगाना राज्यातील भैंसा येथील येथे वास्तव्यात असलेल्या अमिनाबेगम अहमद हुसेन यांचा शोध लागला. या ५० वर्षीय अमिना बेगम सोबत चौधरी शेख हुसेन यांनी मुस्लिम परंपरेनुसार विवाह केला आहे.कुटुंबीयांच्या संमतीने आणि आपुलकीच्या सल्ल्याने त्यांनी आयुष्याच्या उत्तरार्धात सहचारिणी मिळावी या हेतूने पुनर्विवाहाचा घेतलेला निर्णय सध्या या परिसरात चर्चेचा विषय बनला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com