मुंबई : अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघाचं राजकारण पाचपुते, नागवडे, जगताप या बड्या नावांभोवती फिरत असतं. यांच्यावरच विधानसभेचं गणित अवलंबून आहे. परंतु मागील विधानसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या खेळीने ऐनवेळी घन:श्याम शेलार नाव पुढे आलं. परंतु अजूनही श्रीगोंदा मतदारसंघावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचा प्रभाव कायम असल्याचं चित्र आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये याचा प्रत्यय आलाय.
श्रीगोंदा मतदारसंघातून निलेश लंके यांना विक्रमी मतदान झालं. त्यामुळे श्रीगोंदा मतदारसंघावर पुन्हा शरद पवार याचं वर्चस्व असल्याचं दिसून आलं. मतदारसंघात विद्यमान आमदार भाजपचा (Vidhan Sabha Election 2024) आहे, तरी लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीच्या उमेदवाराच्या पारड्यात कमी मत पडली. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत मतदारसंघ महायुती आणि महाविकास आघाडीत कोणत्या घटक पक्षाकडे जातो, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात भाजप उमेदवारांमध्ये मोठी चढाओढ दिसून येतेय. राहुरी विधानसभा मतदारसंघावर दावा करणारे भाजपचे माजी आमदार शिवाजी कर्डीले देखील श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास (Shrigonda News) इच्छुक आहेत. विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळवण्यासाठी भाजपमध्ये मोठी चढाओढ पाहायला मिळत आहे. भाजपचे विद्यमान आमदार बबनराव पाचपुते हे प्रथम दावेदार आहेत. त्यांच्याऐवजी त्यांच्या पत्नी किंवा मुलाला देखील रिंगणात उतरवू शकतात. सुवर्णा पाचपुते (BPJ) या देखील इच्छूक असल्याचं समोर आलंय. परंतु भाजपमधून इच्छूकांची मोठी रांग लागली असल्याचं दिसतंय. त्यामळे उमेदवारी पुन्हा बबनराव पाचपुते मिळणार का? चेहरा बदलणार, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. अजित पवार गटाकडून अनुराधा नागवडे या देखील तयारी करत आहेत. महायुतीकडून नेमकं श्रीगोंदा विधानसभेच्या रिंगणात कोण उतरणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे.
महाविकास आघाडीतून राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाकडून राहुल जगताप यांनी देखील निवडणुकीची तयारी केल्याचं समोर आलंय. ठाकरे गटाकडून घनशाम शेलार आणि बबनराव पाचपुते यांचे पुतणे साजन पाचपुते देखील निवडणूक लढण्यासाठी इच्छूक आहेत. अजून महाविकास आघाडीने जागावाटपचा फॉर्म्युला जाहीर केलेला (Sharad Pawar) नाही. परंतु आजवरपर्यंतची परिस्थिती पाहता शरद पवार यांचा दबदबा श्रीगोंदा तालुक्यात कायम असल्याचा दिसतोय. त्यामुळे उमेदवारीची वर्णी कोणाच्या नावे लागणार, याकडे संपूर्ण नगर जिल्ह्याचं लक्ष लागलेलं आहे.
श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघ हा अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये अटीतटीची लढत झाल्याचं श्रीगोंदा तालुक्यात दिसलं (Maharashtra Politics) होतं. भाजपचे उमेदवार बबनराव पाचपुते १,०३,२५८ मतांनी विजयी झाले होते. तर राष्ट्रवादीचे उमेदवार घनश्याम प्रतापराव शेलार यांना ४,७५० मतांनी पराभव स्वीकारावा लागला होता. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर संपूर्ण राज्याने बंडखोरीचं राजकारण पाहिलं.
श्रीगोंदा तालुक्यात २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमध्ये चुरशीचा सामना रंगला होता. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार राहुल जगताप ९९,२८१ मतांनी विजयी झाले होते. तर भाजपचे बबनराव पाचपुते १३,६३७ मतांनी पराभूत झाले होते. परंतु २०१९ मध्ये भाजपने बाजी पलटली होती. आता नोव्हेंबर महिन्यात विधानसभा निवडणुका होण्याचा अंदाज आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.