Parner Assembly Election : पारनेरमध्ये यंदा राजकीय गणित बदलणार? 'लंके - विखें'मध्ये लढत होणार? वाचा सविस्तर

Vidhan Sabha Election 2024 Parner Matadarsangh : पारनेर विधानसभा मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये चुरशीची लढत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे निवडणुकीच्या रिंगणात नेमकं कोण उतरणार, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
पारनेर विधानसभा मतदारसंघ
Parner Assembly ElectionSaam Tv
Published On

मुंबई : अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर विधानसभा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. शिवसेनेचे विजय औटी यांनी पारनेरचा पर्मनंट आमदार अशी स्वतःची आगळीवेगळी ओळख तयार केली होती. सलग पंधरा वर्ष त्यांनी मतदार संघावर आपला दबदबा कायम ठेवला होता. पण पारनेरच्या राजकारणात २०१८ साली खऱ्या अर्थाने ट्विस्ट आला होता. निलेश लंके यांनी औटी यांना धूळ चारत २०१९ मध्ये विजयाचा गुलाल उधळला होता.

अहमदनगर लोकसभा मतदारसंघात यंदा महाविकास आघाडीतील शरद पवार गटाचे उमेदवार निलेश लंके यांनी दणक्यात विजय मिळवला. लंके यांच्या विजयानंतर आता पारनेर विधानसभा मतदारसंघाची राजकीय गणितं बदलली (Vidhan Sabha Election 2024) आहेत. डॉ. सुजय विखे यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाला. त्यानंतर पारनेर मतदारसंघातील राजकीय संघर्ष आणखी तीव्र होत असल्याचं दिसतंय. त्यामुळे विखे लोकसभेतील पराभवाचा वचपा विधानसभा निवडणुकीत काढणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

सध्या काय चित्र ?

निलेश लंके यांच्या जागेवर पक्षाच्या वतीने राणीताई लंके या प्रथम दावेदार असल्याचं दिसतंय. तालुक्यात सध्या विविध कार्यक्रमांत आणि सोशल मीडियावर देखीलह भावी आमदार अशी उपाधी राणीताई यांच्या नावापुढे जोडली (Parner Matadarsangh) जातेय. सध्या पारनेर विधानसभा मतदारसंघात शरद पवार गटाकडून राणी लंके या विधानसभेसाठी दावेदार असल्याचं दिसतंय. तर महाविकास आघाडीत मात्र मोठी रस्सीखेच पाहायला मिळत आहे. अजित पवार गटाकडून प्रशांत गायकवाड, सुजित झावरे, काशिनाथ दाते हे इच्छुक असल्याचं समोर येतंय. तर भाजपकडून विश्वनाथ कोरडे, सुनील थोरात यांची नावं समोर आली आहेत. शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून श्रीकांत पठारे हे देखील इच्छुक असल्याच्या चर्चा सुरू आहेत.

लोकसभा निवडणुकीत काय चित्र?

पारनेरमध्ये २०१९ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे व राष्ट्रवादीचे संग्राम जगताप यांच्यामध्ये चुरशीची लढत झाली होती. त्यावेळी सुजय विखे यांनी १ लाख १७ हजार ८१ मत मिळवित संग्राम जगताप यांचा पराभव केला होता. तर राष्ट्रवादीचे संग्राम जगताप यांना ८० हजार ३७२ मते पारनेर मतदारसंघातून मिळाली होती. विखे यांनी ३६ हजार मतांची आघाडी घेतली (Nilesh Lanke Wife Rani Lanke Against Sujay Vikhe) होती. तर यंदा लोकसभेच्या निवडणुकीत भाजप उमेदवार सुजय विखे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे निलेश लंके यांच्यात लढत झाली होती. यावेळी पारनेर तालुक्यामध्ये निलेश लंके यांना १ लाख ३० हजार ४४० मतं मिळाली होती. तर विखे यांना ९२ हजार ३४० मतांवर समाधान मानावं लागलं होतं. तालुक्यातील उमेदवार असल्यामुळे लंके यांना पारनेर तालुक्यामध्ये ३८ हजार २०० मतांची आघाडी मिळाली होती.

पारनेर विधानसभा मतदारसंघ
Shirdi Assembly Constituency: शिर्डीत यंदा कोण वाजवणार विजयाचा डंका? सध्या काय आहे राजकीय परिस्थिती, वाचा सविस्तर...

२०१९ ची विधानसभा निवडणूक

पारनेर विधानसभा मतदारसंघ हा अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचा एक भाग आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीमत पारनेरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये चुरशीची लढत झाली (MVA Vs Mahayuti) होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नीलेश ज्ञानदेव लंके १,३९,९६३ मतांनी विजयी झाले होते, तर शिवसेनेचे विजय औटी यांचा ५९, ८३८ मतांनी पराभव झाला होता. २०१४ च्या निवडणुकीनंतर निलेश लंके यांनी शरद पवार गटात प्रवेश केला होता. त्यांनी २०१९ मध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवली होती.

२०१४ ची विधानसभा निवडणूक

पारनेरमध्ये २०१४ ची विधानसभा निवडणुकीत तिसऱ्यांदा शिवसेनेचे उमेदवार विजय औटी यांनी विजयाचा गुलाल उधळला होता. त्यांचा ७३,२६३ मतांनी विजय झाला होता. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सुजित झावरे यांचा २७,४२२ मतांनी पराभव झाला होता. २०१४ मध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेना यांच्यात अटीतटीचा सामना रंगल्याचं चित्र पारनेर तालुक्याला पाहायला मिळालं होतं. यंदा ऑक्टोबर महिन्यात निवडणूक होण्याची शक्यता आहे.

पारनेर विधानसभा मतदारसंघ
Rahuri Assembly Election : राहुरीत यंदा 'तुतारी विरुद्ध घड्याळ' सामना रंगणार? काय आहे मतदारसंघात राजकीय परिस्थिती? घ्या जाणून...

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com