Rahuri Assembly Election : राहुरीत यंदा 'तुतारी विरुद्ध घड्याळ' सामना रंगणार? काय आहे मतदारसंघात राजकीय परिस्थिती? घ्या जाणून...

Rahuri Vidhansabha Matadarsangh Assembly Election 2024 : राहुरी विधानसभा मतदारसंघात यंदा तुतारी विरुद्ध घड्याळ, असा सामना रंगण्याची शक्यता आहे. आपण राहुरी विधानसभा मतदारसंघाची सध्याची राजकीय परिस्थिती जाणून घेवू या.
राहुरी विधानसभा मतदारसंघ
Rahuri Assembly ElectionSaam Tv
Published On

मुंबई : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीची घोषणा ऑक्टोबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये होण्याची शक्यता आहे. राहुरी विधानसभा मतदार संघात देखील निवडणुकीचं वारं वाहू लागलंय. या मतदारसंघात ही इच्छुकांची गर्दी होण्यास सुरवात झालीय. राहुरी मतदारसंघातील मुख्य लढत 'राष्ट्रवादी विरूद्ध राष्ट्रवादी' म्हणजे शरद पवार गट आणि अजित पवार गट यांच्यात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राहुरीत तुतारी आणि घड्याळ रणधुमाळी रंगणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

लोकसभा निवडणुकीमध्ये नगरमध्ये महाविकास आघाडीची सत्ता (Rahuri Vidhansabha Matadarsangh) आहे. त्यामुळे राहुरीचे विद्यमान आमदार प्राजक्त तनपुरे यांना राजकीय अस्तित्व अबाधित ठेवण्यासाठी यंदा विधानसभा निवडणुकीमध्ये प्रयत्न करावे लागणार आहेत. तर विरोधकांना अस्तित्व सिद्ध करण्याकरिता आगामी विधानसभा निवडणुकीत कसुन प्रयत्न करावे लागणार आहेत.

सध्या काय परिस्थिती ?

राहुतील यंदा कर्डिले आणि तनपुरे यांच्यात यंदा लढत रंगणार का? असा प्रश्न निर्माण होत आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपाचा फैरी आणि राजकीय डावपेच टाकण्यास सुरुवात झाल्याचं (Assembly Election 2024) दिसतंय. राहुरीचे विद्यमान आमदार प्राजक्त तनपुरे हे जयंत पाटील यांचे भाचे आहेत. तर अजित पवार आणि चंद्रशेखर कदम मामेभाऊ असल्याचं समोर येतंय. सुजय विखे यांनी देखील राहुरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी इच्छूक असल्याचं बोलून दाखवलं आहे. त्यामुळे आता उमेदवारीसाठी महायुतीमध्ये रस्सीखेच दिसून येत आहे. आता नेमकं महायुती राहुरीतून कोणाला रिंगणात उतरवणार, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

यंदा विधानसभेच्या रिंगणात महाविकास आघाडीकडून शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्राजक्त तनपुरे हेच प्रथम दावेदार आहेत. तर माजी आमदार चंद्रशेखर कदम यांचे चिरंजीव सत्यजित कदम देखील इच्छुक असल्याचं समोर (Maharashtra Politics) आलंय. भाजपाची उमेदवारी मिळवण्यासाठी त्यांनी वडिल चंद्रशेखर कदम यांना देखील उमेदवारी मिळवण्यासाठी भाजपच्या वरिष्ठ नेत्याकडे साकडे घालण्यासाठी भाग पाडलंय. त्यामुळे महायुतीमध्ये उमेदवारासाठी रस्सीखेंच सुरू असल्याचं दिसतंय. सत्यजित कदम आणि प्राजक्त तनपुरे यांच्यात यंदा सामना रंगण्याची शक्यता राजकीय विश्लेषक वर्तवत आहेत.

राहुरी विधानसभा मतदारसंघ
Shirdi Assembly Constituency: शिर्डीत यंदा कोण वाजवणार विजयाचा डंका? सध्या काय आहे राजकीय परिस्थिती, वाचा सविस्तर...

२०१९ ची विधानसभा निवडणूक

राहुरी विधानसभा मतदारसंघ हा अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे. २०१९ मध्ये भाजप विरूद्ध राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये चुरशीची लढत झाली होती. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार प्राजक्त प्रसादराव तनपुरे १,०९, २३४ मतांनी विजयी झाले (Ajit Pawar Vs Sharad Pawar) होते. तर भाजपचे कर्डिले शिवाजी भानुदास यांचा २३,३२६ मतांनी पराभूत झाले होते. २०१९ मध्ये प्रसाद तनपुरे यांचे पुत्र प्राजक्त तनपुरे राहुरीचे आमदार झालेत. दरम्यानच्या काळात त्यांनी मिळालेल्या मंत्रीपदाचा मतदारसंघात उपयोग करून अनेक प्रलंबीत कामे मार्गी लावले आहेत. यादरम्यान शिवाजीराव कर्डीले यांनी राहुरीशी आपली नाळ कायम ठेवल्याचं दिसतंय.

२०१४ ची विधानसभा निवडणूक

२०१४ ची विधानसभा निवडणूक भाजप विरूद्ध शिवसेनेमध्ये अटीतटीचा सामना झाला होता. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे शिवाजी भानुदास कर्डिले ९१,४५४ मतांनी विजयी झाले होते. शिवसेना पक्षाच्या डॉ. उषाप्रसाद तनपुरे यांचा २५,६७६ मतांनी पराभव झाला होता. यंदा आता नोव्हेंबर महिन्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. तेव्हा कोण बाजी मारणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. अजित पवार विरूद्ध शरद पवार यांच्यात लढत झाल्यास कोणाचं पारडं जड भरणार, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

राहुरी विधानसभा मतदारसंघ
Kopargaon Assembly constituency: कोपरगाव मतदारसंघात कोण फडकवणार विजयाची पताका? काळे-कोल्हेंच्या लढाईकडे साऱ्यांचं लक्ष

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com