Vidhan Parishad Election: महायुतीच्या १७ अधिकृत उमेदवारांची नावं जाहीर, कोण कुठून निवडणूक लढवणार?

Vidhanparishad Election Mahayuti Candidate List: विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीने १७ उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. हे १७ उमेदवार कोणकोण आहेत? कुणाला कुठून संधी मिळाली? हे आपण जाणून घेणार आहोत...
Vidhan Parishad Election: महायुतीच्या १७ अधिकृत उमेदवारांची नावं जाहीर, कोण कुठून  निवडणूक लढवणार?
Vidhanparishad Election Mahayuti Saam Tv
Published On
  • विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीच्या उमेदवारांची नावं जाहीर

  • महायुती सर्वच्या सर्व १७ जागांवर लढणार निवडणूक

  • येत्या १८ जून रोजी होणार मतदान

विधान परिषदेच्या १७ जागांसाठी निवडणुका होणार आहे. या निवडणुकीसाठी येत्या १८ जून रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीमध्ये महायुती सर्व जागांवर निवडणूक लढणार असून महायुतीच्या अधिकृत उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली आहे. ही निवडणूक बिनविरोध होणार नाही कारण या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी देखील सर्वच्या सर्व १७ जागांवर निवडणूक लढवणार आहे. महायुतीने कोणत्या उमेदवाराला कुठून संधी दिली ही संपूर्ण यादी आपण पाहणार आहोत...

विधान परिषद निवडणुकीमध्ये महायुतीमध्ये भाजप ११ जागांवर निवडणूक लढवत आहे. शिवसेना शिंदे गट ४ जागांवर तर सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादी २ जागांवर निवडणूक लढवत आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस सर्वाधिक ८ जागांवर निवडणूक लढवत आहे. ठाकरेंची शिवसेना ६ जागांवर आणि शरद पवारांची राष्ट्रवादी ३ जागांवर निवडणूक लढवणार आहे.

Vidhan Parishad Election: महायुतीच्या १७ अधिकृत उमेदवारांची नावं जाहीर, कोण कुठून  निवडणूक लढवणार?
MLC Election : नाशिकमध्ये महायुतीतच तिढा; जागा शिंदेंच्या शिवसेनेला सुटली, पण भाजप अन् राष्ट्रवादीचे उमेदवारही मैदानात

राज्यातील विधान परिषदेच्या १७ जागांसाठीच्या निवडणुकीसाठी २५ मे रोजी अधिसूचना जाहीर करण्यात आली होती. विधान परिषदेच्या १७ जागांसाठी येत्या १८ जून रोजी मतदान होणार आहे. सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. मतमोजणी पाचव्या दिवशी म्हणजे २२ जून रोजी होणार आहे. या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख १ जून होती. अर्जाची छाननी २ जूनला होणार आहे. तर अर्ज माघारी घेण्याची शेवटची तारीख ४ जून म्हणजे उद्या आहे.

Vidhan Parishad Election: महायुतीच्या १७ अधिकृत उमेदवारांची नावं जाहीर, कोण कुठून  निवडणूक लढवणार?
MLC Polls: विक्रम काकडेंसाठी पार्थ पवार आग्रही,पक्षाची पसंती मात्र टिंगरे; राष्ट्रवादीने २ उमेदवार कसे दिले?

महायुतीचे अधिकृत १७ उमेदवार कोणते?

नागपूर - डॉ. राजीव भास्करराव पोतदार

भंडारा- गोंदिया - अविनाश आनंदराव ब्राह्मणकर

वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली - अरुण हनुमंत लखानी

अमरावती - प्रविण रामचंद्र पोटे

सोलापूर - राजेंद्र विठ्ठल राऊत

अहमदनगर - प्राजक्त प्रसादराव तनपुरे

जळगाव - नंदकिशोर भागवत महाजन

सांगली-सातारा - धैर्यशील ज्ञानदेव कदम

नांदेड - अमरनाथ अनंतराव राजूरकर

उस्मानाबाद-लातूर-बीड - बसवराज माधवराव पाटील

औरंगाबाद-जालना - सुहास त्र्यंबकराव शिरसाठ

ठाणे - रविंद्र सदानंद फाटक

यवतमाळ - दुष्यंत सतीश चतुर्वेदी

परभणी-हिंगोली - सईद शेरगुल खान

नाशिक - नरेंद्र भिकाजी दराडे

रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग - अनिकेत सुनिल तटकरे

पुणे - विक्रम संजय काकडे

Vidhan Parishad Election: महायुतीच्या १७ अधिकृत उमेदवारांची नावं जाहीर, कोण कुठून  निवडणूक लढवणार?
MLC Election : मोठी बातमी! शिंदेसेनेच्या दिग्गज नेत्यावर गुन्हा दाखल, जिल्हाधिकारी कार्यालयात नेमकं झालं काय?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com