Vidhan Parishad Election 2024: मनसे पहिल्यांदाच विधानपरिषदेच्या मैदानात; पानसे रिंगणात,डावखरेंचा पत्ता कट?

Abhijeet Panse : यंदा कोकण पदवीधर मतदारसंघात यंदा मनसे निवडणुक लढवणार आहे. मनसेचे वतीने अभिजीत पानसे यांना उमेदवारी देण्यात आली. यानंतर माध्यमांना प्रतिक्रिया दिली. यंदा युवकांसाठी आम्ही जाहीरनामा, वचनामा सादर करणार नाही तर आमचा 'रोजगार नामा' जाहीर करू, असं पानसे म्हणालेत.
Vidhan Parishad Election 2024: मनसे पहिल्यांदाच विधानपरिषदेच्या मैदानात; पानसे रिंगणात,डावखरेंचा पत्ता कट?
Vidhan Parishad Election Abhijeet Panse
Published On

तन्मय टिल्लू, साम प्रतिनिधी

मुंबई: कोकण पदवीधरमधून मनसेने अभिजीत पानसेंना उमेदवारी जाहीर केली. मात्र आता पानसेंची उमेदवारी ही मनसेची की महायुतीची असा सवाल उपस्थित झाला आहे. कोकण पदवीधरमधून डावखरे हे भाजपचे आमदार आहेत. त्यामुळे निरंजन डावखरेंचा पत्ता कापला जाणार का की त्यांना वेगळी जबाबदारी मिळणार बघूया.

गेल्या काही वर्षांपासून कोणतीच निवडणूक न लढवणाऱ्या मनसेने यंदा लोकसभेला भाजपला पाठिंबा देताना विधानसभा लढविण्याची घोषणा केली होती. त्याची सुरुवात विधानपरिषदेच्या जागेपासून झाल्याचं दिसंतय. राज ठाकरेंची मनसे पहिल्यांदाच विधानपरिषद निवडणुकीच्या रणांगणात उतरलीय. राज ठाकरेंनी कोकण विभाग पदवीधर मतदारसंघासाठी मनसेच्या उमेदवाराची घोषणा केलीय. त्यामुळे गेली 2 टर्म कोकण विभाग पदवीधरचे भाजप आमदार निरंजन डावखरेंचा पत्ता कट झाल्याची चर्चा रंगलीय

विधानपरिषदेच्या चार जागांसाठी 26 जून निवडणूक होणार आहे. विधानपरिषदेत मुंबई पदवीधर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे उद्धव ठाकरे गटाचे विलास पोतनीस, कोकण पदवीधर मतदारसंघातील भाजपचे निरंजन डावखरे, मुंबई शिक्षकचे कपिल पाटील आणि नाशिक शिक्षकचे किशोर दराडे यांची मुदत 7 जुलै रोजी संपणार आहे. त्यामुळे या चार जागांसाठी निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे.

कोणाकोणाला उमेदवारी जाहिर करण्यात आलीये पाहूया.

उद्धव ठाकरे गट -

अनिल परब, मुंबई पदवीधर मतदारसंघ

ज. मो. अभ्यंकर, शिक्षक सेना प्रांताध्यक्ष, मुंबई शिक्षक मतदारसंघ

मनसे/महायुती -

अभिजीत पानसे,कोकण विभाग पदवीधर मतदारसंघ

शिंदे गट - दीपक सावंत,इच्छुक, मुंबई पदवीधर मतदारसंघ

कोण आहेत अभिजीत पानसे

राज ठाकरे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळख

अभिजीत पानसे प्रसिद्ध सिनेलेखक आणि दिग्दर्शक

त्यांचे रेगे, ठाकरे आणि रानबाजारसारखी वेबसीरीज गाजली

शिवसेनेत विद्यार्थी सेनेची धुरा अभिजीत पानसेंनी सांभाळली

2014 मध्ये पानसेंनी ठाणे लोकसभा निवडणूक लढवली

सध्या मनसेच्या चित्रपटसेनेची जबाबदारी पानसेंच्या खांद्यावर

मात्र अभिजीत पानसे मनसेचे उमेदवार की महायुतीचे हे पाहणं महत्त्वाचं असेल. दरम्यान 2018 च्या विधानपरिषद निवडणुपूर्वी निरंजन डावखरेंनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजप प्रवेश केला. लगेचच त्यांना कोकण पदवीधर मतदारसंघातून तिकीट जाहीर झालं होतं. आता भाजपचा मित्रपक्ष असलेल्या मनसेनं कोकण पदवीधर मतदारसंघातून उमेदवार उतरविल्यानं डावखरेंना तिकीट मिळणार की नाही? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

'एनडीए'ला बाहेरून पाठिंबा दिलेल्या मनसेनं भाजपच्या जागेवर उमेदवार जाहीर केला आहे. त्यामुळे पानसे महायुती की मनसेचे उमेदवार, याबाबत चर्चांना उधाण आलं आहे. त्यामुळे भाजपचे निरंजन डावखरेही रिंगणात असणार की आगामी विधानसभेची तयारी करणार याकडे लक्ष लागलंय.

Vidhan Parishad Election 2024: मनसे पहिल्यांदाच विधानपरिषदेच्या मैदानात; पानसे रिंगणात,डावखरेंचा पत्ता कट?
Loksabha Election: सत्तेच्या खुर्चीवर कोण होणार विराजमान? लोकसभेच्या अखेरच्या टप्प्यात होणार क्लिअर, जाणून घ्या कसं?

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com