

विधान भवनाला पुन्हा एकदा बॉम्बस्फोटाची धमकी देणारा ई-मेल आलाय.
ई-मेलमध्ये विधान भवनासह मंत्रालय, मुंबई मेट्रो स्टेशन आणि स्टॉक एक्सचेंजलाही उडवण्याची धमकी
कडक सुरक्षा तपासणीनंतर संबंधित धमकीचा ई-मेल हॉक्स असल्याचे स्पष्ट झालंय.
विधान भवनाला पुन्हा धमकीचा ई-मेल मिळाला आहे. विधान भवनाला बॉम्ब स्फोटानं उडवून देण्याची धमकी मेलमधून देण्यात आली आहे. शुक्रवारी सकाळी ८ वाजून ११ मिनिटांनी धमकीची ई-मेल असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. दरम्यान सुट्टीचा दिवस असल्याने पोलीस यंत्रणेकडून जलदगतीनं तपासणी केली जातेय. संपूर्ण विधिमंडळाची तपासणी केल्यानंतर हॉक्स ई-मेल असल्याचं स्पष्ट झालंय.
धमकीचा ई-मेल शुक्रवारी दुपारी १ वाजून ११ मिनिटांनी बॉम्ब स्फोट घडवून आणण्याचा उल्लेख होता. विधान भवनासोबतच ई-मेलमध्ये मेट्रो स्टेशन, मंत्रालय, स्टॉक एक्सचेंजचा देखील उल्लेख होता. आज सकाळी कडक एसओपींसोबतच विधिमंडळ परिसरातील कसून तपासणी करण्यात आली. याआधी विधीमंडळाचे सत्र चालू असताना धमकीचा ई-मेल आला होता. आता पुन्हा सत्र चालू असतानाच धमकीचा मेल आलाय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.