पहा Video : नाशिकमध्ये पुष्पाचा धुमाकूळ! पोलिसांच्या निवासस्थानातून चंदनाची चोरी

वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या घरांनाचं पुष्पा करतोय टार्गेट; तुरुंग अधिक्षक प्रमोद वाघ यांच्या बंगल्यातील चंदनाची 5 झाडं चोरीला...
पहा Video : नाशिकमध्ये पुष्पाचा धुमाकूळ! पोलिसांच्या निवासस्थानातून चंदनाची चोरी
पहा Video : नाशिकमध्ये पुष्पाचा धुमाकूळ! पोलिसांच्या निवासस्थानातून चंदनाची चोरीSaamTvNews
Published On

- तबरेज शेख

नाशिक : नाशिकमध्ये दोन दिवसांत दोन वरिष्ठ पाेलिस अधिकाऱ्यांच्या घरी चंदनाच्या झाडांची चोरी झाल्याने एकाच खळबळ उडाली आहे. नाशिकच्या पुष्पाला (Pushpa) पकडण्याचं मोठं आव्हान आता पोलिसांसमोर आहे. नाशिकमध्ये (Nashik) गडकरी चौकात असलेल्या विशेष पोलिस (Police) महानिरीक्षक बी जि शेखर यांच्या बंगल्यातून चंदनाच्या झाडांची चोरी करण्यात आलीय.

विशेष म्हणजे ज्या ठिकाणी त्यांचा बंगला आहे, त्याच्या शेजारी पोलिस उपायुक्त आणि सेंट्रल युनिट ऑफिस असतांना सुद्धा चोरी झाल्याने आश्चर्य व्यक्त केलं जातं आहे. सीसीटीव्हीत (CCTV) दिसणारा हाच चोर आहे जो आपल्या साथीदाराच्या मदतीने चंदनाच्या झाडांची (Sandalwood) चोरी करून पसार झाला आहे. दोन दिवसांपूर्वी नाशिकराेड येथील तुरुंग अधिक्षक प्रमाेद वाघ यांच्या बंगल्यातूनही चंदनाच्या 5 झाडांची चोरी (Theft) झाली होती.

पहा Video : नाशिकमध्ये पुष्पाचा धुमाकूळ! पोलिसांच्या निवासस्थानातून चंदनाची चोरी
बायकोचा हट्ट पुरवण्यासाठी नवरदेवाने काढली चक्क जेसीबी वर वरात!

तर, आज गडकरी चाैकातील नाशिक परिक्षेत्राचे पोलिस उपमहानिरीक्षक बी. जी. शेखर यांच्या बंगल्यातून चंदनाच्या झाडांची चोरी झाल्यानं खळबळ उडालीय. कारण ही दोन्ही शासकीय निवासस्थानं अति सुरक्षित मानली जातात. त्यामुळे हा नाशिकचा ‘पुष्पा’ कोण? असा प्रश्न पोलिसांसह नाशिककरांना पडला आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com