Akola News: थेट दारापर्यंत पोहोचणार पशुवैद्यक, अकोल्यातील ३ तालुक्यात फिरते पशुचिकित्सा पथक

veterinary clinic : जिल्ह्यातील पशूधन कमी होत आहे. पशूधनाची क्षमता वाढविण्यासाठी पशुसंवर्धन आणि दुग्धविकास विभागामार्फत फिरते पशुवैद्यकीय पथक स्थापन करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील अकोला, मूर्तिजापूर, अकोट या तालुक्यात हे पथक फिरणार आहे.
Moving veterinary In Akola
Moving veterinary In AkolaWelcome to PGIVAS, Akola
Published On

(हर्षदा सोनवणे)

Moving veterinary Clinic Squad In Akola:

आता दवाखाना दूर जरी असला, तरी पशुपालकांची चिंता मिटली आहे. मुख्यमंत्री पशू स्वास्थ योजनेंतर्गत ‘फिरते पशुचिकित्सा पथक’ जिल्ह्यातील तीन तालुक्यांत कार्यान्वित होणार असून, त्यानुसार आता पशू वैद्यकीय अधिकारी थेट पशुपालकांच्या दारापर्यंत पोहोचणार आहे. फिरते पशू वैद्यकीय पथक अत्याधुनिक सेवेसह सज्ज असून, त्यामध्ये पशू संवर्धन विभागाचे तीन कर्मचारी असणार आहेत. या पथकासाठी जिल्ह्याला तीन वाहने मिळाली आहे.(Latest News)

जिल्ह्यातील पशूधन कमी होत आहे. पशूधनाची क्षमता वाढविण्यासाठी पशुसंवर्धन आणि दुग्धविकास विभागामार्फत फिरते पशुवैद्यकीय पथक स्थापन करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील अकोला, मूर्तिजापूर, अकोट या तालुक्यात हे पथक फिरणार आहे. या फिरते पशू वैद्यकीय पथकात जीपीएस ॲक्टिव्हेटेड राहणार आहे. त्यासाठी पशुपालकांना संबंधित क्रमांकावर संपर्क साधावा लागेल.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

तर गेल्या काही वर्षांमध्ये पशूंचे पालन करणे न परवडणारे झाल्याने पशुधन झपाट्याने घटत चालले आहे. सद्य:स्थितीत जिल्ह्यात २ लाख ८३ हजार ६८ इतके पशूधन आहे. त्यांच्या आरोग्याची जबाबदारी पशुसंवर्धन विभागाकडे आहे. तर पशूधनाची क्षमता वाढविण्यासाठी त्यांचे आरोग्य उत्तम असणे गरजेचे आहे. त्यामुळे पशू वैद्यकीय रुग्णालयाची संख्या कमी आहे.

त्यात दळणवळणाच्या सेवा अपुऱ्या यामुळे पशुरुग्णांना पशुवैद्यकीय सेवा तत्काळ मिळावी. या हेतूने पशुपालन व डेअरी विभाग भारत सरकार आणि पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने फिरते पशुवैद्यकीय पथक स्थापण्यात आले आहे. लवकरच हे फिरते पशुवैद्यकीय पथक कार्यान्वित होणार आहे.

Moving veterinary In Akola
Nandurbar Agriculture News: ४ एकरावर पपईचं पीक घेतलं; वर्षभर राबला, शेवटी रोटावेटर फिरवलं, शेतकरी इतका हतबल का झाला?

१९६२ क्रमांकावर करा कॉल

ज्याप्रमाणे पशू वैद्यकीय दवाखान्यामार्फत पशू वैद्यकीय सेवा पुरविल्या जातात. त्याचप्रमाणे फिरत्या पशुवैद्यकीय दवाखान्यामार्फत सेवा पुरविल्या जाणार आहेत. पशू वैद्यकीय सेवा प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी पशुपालकांनी १९६२ या टोल फ्री क्रमांकावर फोन करून आपल्या अडचणींची नोंदव करावी लागणार आहे.

Moving veterinary In Akola
Beed News: दुग्ध व्यवसाय अडचणीत; पशुखाद्याचे दर वाढले पण उत्पन्न घटलं

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com