(विनोद जिरे)
पशुखाद्याचे दर वाढल्याने आणि दुधाचे उत्पन्न घटल्याने बीड जिल्ह्यातील दुग्ध व्यवसाय अडचणीत आला आहे. उत्पादन खर्च आणि दुधाला मिळणारा भाव या तफावत आढळत असल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. त्यातच दुष्काळी परिस्थितीमुळे चारा आणि पाणी टंचाई सामना करताना शेतकऱ्याची दमछाक होत आहे.(Latest News)
शेतीला (Farming) जोडधंदा म्हणून बहुतांश शेतकरी दुग्ध व्यवसायाकडे वळल्याचे दिसून येतात. मात्र आता तोही व्यवसाय परवडत नसल्याचे शेतकऱ्यांची ओरड आहे. कारण पशुखाद्याच्या दरात मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली असताना दुसरीकडे मात्र दुधाच्या (milk) दरात घट होताना पाहायला मिळत आहे. दरम्यान उत्पादन खर्चाच्या तुलनेत अत्यल्प उत्पन्नाचे समीकरण, यामुळे दुग्ध व्यवसाय परवडत नसल्याने शेतकरी (Farmer) अडचणीत सापडले आहेत.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
दुध उत्पादकांना अनुदान मिळणार
पशू खाद्य, चारा , ढेप याचे दर वाढल्यामुळे राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुधाचा व्यवसाय परवडत नाही. पशू खाद्याचे दर वाढलेत पण दुधाच्या किमती त्या तुलनेने कमी आहेत. अशा स्थितीमध्ये दूध उत्पादक शेतकऱ्यांना येणारा खर्च सुद्धा निघणे आता कठीण झालं आहे. दरम्यान सरकारने राज्यातील दूध उत्पादन शेतकऱ्यांना आता गाईच्या दुधावर ५ रुपये प्रति लिटर एवढे अनुदान देण्याची घोषणा केलीय.
राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलेली ही माहिती आहे. राज्यातील सहकारी दूध संघाने दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लिटर २९ रुपये या दराने दुधाचा दर देणे अपेक्षित आहे. प्रति लिटर दुधामध्ये ५ रुपये एवढे अनुदान दूध उत्पादकांच्या खात्यामध्ये राज्य शासना अंतर्गत जमा करण्यात येईल.
शासन राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक हित जोपासण्यासाठी बाजारात उचित हस्तक्षेप करत आहे. शासनाने यापूर्वी राज्यातील अतिरीक्त दुधाचे नियोजन करण्यासाठी अनुदान योजना राबविली होती. शासनाने शेतकऱ्यांचे अतिरीक्त दूध स्वीकारून त्याचे दुध भुकटी आणि बटरमध्ये रूपांतरण करून अतिरीक्त दुधाचा प्रश्न मार्गी लावला होता. आताही सरकारने दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला, असल्याचं राधाकृष्ण विखे-पाटील अनुदानाच निर्णय जाहीर करताना म्हटलं होतं.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.