Nandurbar News: हमी भावापेक्षा कमी दरात कापूस खरेदी; नंदुरबारमधील कापूस उत्पादक शेतकरी संतप्त

Nandurbar News: सरकारी हमी भावापेक्षा कमी दरात कापूस खरेदी सुरू असल्याने नंदुरबारमधील शेतकरी संतप्त झाले आहेत. मंत्र्यांना दौरे करायला वेळ आहे. मात्र कापूस उत्पादक शेतकऱ्याकडे लक्ष देण्यास वेळ नाही असा आरोप या शेतकऱ्यांनी केला आहे.
Nandurbar News
Nandurbar NewsSaam tv
Published On

सागर निकवाडे, नंदुरबार|ता. २९ डिसेंबर २०२३

Nandurbar Farmer News:

नंदुरबार जिल्ह्यामध्ये सरकारी हमी भावापेक्षा कमी दरात कापूस खरेदी सुरू आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकरी संतप्त झाला आहे. मंत्र्यांना दौरे करायला वेळ मात्र कापूस उत्पादक शेतकऱ्याकडे लक्ष देण्यास वेळ नाही असा आरोप या शेतकऱ्यांनी केला आहे. (Latest Marathi News)

नंदुरबार जिल्ह्यात (Nandurbar) जवळपास दीडलाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर कापसाची लागवड करण्यात आल. मात्र दुष्काळी परिस्थिती मुळे कापसाच्या उत्पादनांत प्रचंड घट आली आहे. अशा परिस्थितीत कापसाला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे उत्पादन खर्चही निघणार नसल्याची स्थिती आहे.

सरकारने कापसाला जाहीर केलेल्या हमी भावापेक्षा कमी भावात व्यापाऱ्यांकडून कापसाची खरेदी केली जात आहे. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष दिसून येत आहे. मंत्र्यांना दौरे करण्यास वेळ आहे. एकमेकांवर टीका करण्यास वेळ आहे, मात्र शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवायला वेळ नाही.. अशी संतप्त प्रतिक्रिया शेतकऱ्यांमध्ये उमटत आहे.

Nandurbar News
Plastic Rice : रेशनच्या तांदळात आढळला प्लास्टिक तांदूळ; घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशीची मागणी

दरम्यान, जिल्ह्यात कापसाला ६३३० ते ७५०० पर्यंत दर मिळत आहे मात्र सरकारने जाहीर केलेला हमीभाव व्यापाऱ्यांकडून देण्यात येत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष आहे आता तरी सरकारने कापुस उत्पादक शेतकऱ्यांसाठी उपाय योजना केल्यास आत्महत्या वाढण्याची भिती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Nandurbar News
Yavatmal News : यवतमाळमध्ये डॉक्टर विद्यार्थिनीची आत्महत्या; वसतीगृहातच संपवलं जीवन

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com