Nandurbar Agriculture News: ४ एकरावर पपईचं पीक घेतलं; वर्षभर राबला, शेवटी रोटावेटर फिरवलं, शेतकरी इतका हतबल का झाला?

Nandurbar News: नंदुरबार जिल्ह्यात जवळपास दहा हजार एकर क्षेत्रावर पपईची लागवड करण्यात आली आहे. मात्र, उत्तरेकडील राज्यांमध्ये पपईची मागणी कमी झाली आहे आणि चांगला भाव मिळत नाही. त्यामुळे शेतावर रोटरवेटर फिरवण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
Nandurbar Agriculture News in Marathi
Nandurbar Agriculture News in MarathiSaam Tv
Published On

Nandurbar Farmer Rotated Papaya Farm:

देशातील सर्वात मोठा पपई उत्पादक जिल्हा म्हणून नंदुरबार जिल्ह्याची ओळख आहे. नंदुरबार जिल्ह्यात जवळपास दहा हजार एकर क्षेत्रावर पपईची लागवड करण्यात आली आहे. मात्र, उत्तरेकडील राज्यांमध्ये पपईची मागणी कमी झाली आहे. त्यामुळे व्यापारी पपई खरेदी करत नाहीये. तर दुसरीकडे व्यापारी मनमानी करून तीन ते पाच रुपये किलोचा भाव देत आहेत. त्यामुळे पपईचा उत्पादन खर्चदेखील निघत नाहीये. त्यामुळेच शेतकरी पपईच्या शेतांवर रोटावेटर फिरवत असल्याची स्थिती नंदुरबार जिल्ह्यात निर्माण झाली आहे. (Latest News)

शहादा तालुक्यातील परिवर्तन येथील प्रल्हाद पाटील यांनी आपल्या चार एकर क्षेत्रामध्ये पपईची लागवड केली होती. त्यासाठी त्यांना एकरी ८० ते ९० हजार रुपयांचा खर्च झाला. मात्र, आता पपई काढणीला आली आहे. परंतु पपईला मागणी कमी असल्याचं कारण दाखवत व्यापारी पपई विकत घेण्यास असमर्थता दाखवत आहेत.

व्यापाऱ्यांकडून मिळत असलेल्या भावात पपई ची शेती करणे परवडत नसल्याने शेतकऱ्यांनी पपईच्या पिकावर रोटावेटर फिरवण्यास सुरुवात केली आहे. अगोदरच पपईवर असलेल्या विविध विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भावामुळे शेतकरी अडचणीत होता. त्यानंतर आता व्यापाऱ्यांच्या मनमानीमुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे.

Nandurbar Agriculture News in Marathi
Amalner News : उभ्या कारला अचानक लागली आग; कारमध्ये झोपलेले दोघे जखमी

नंदुरबार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पपई लागवड केली जात असते. उत्तरेकडील व्यापारी पपई खरेदी करण्यासाठी येत असतात. मात्र, या वर्षी मागणी कमी आसल्याने दर मिळत नसल्याचे चित्र आहे. यातून मार्ग काढण्यासाठी पपई केळी उत्पादक बागायतदार संघ व व्यापारी व शेतकऱ्यांची बैठक करुन मार्ग काढण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पपईवर रोटावेटर मारण्यासारखा निर्णय घेऊ नये, असे आव्हान शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अभिजीत पाटील यांनी केले आहे.

पपईचे दर ठरवण्यासाठी सरकारच्या वतीने एक समिती नेमण्यात यावी. त्याच्याच माध्यमातून पपईचे दर ठरविण्यात यावे. मात्र पपईचे दर ठरविण्यासाठी अशी कुठलीही समिती नाही व्यापारी आणि शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या माध्यमातून ठरवलेली समन्वय समिती हे दर ठरवत असतात. मात्र, सरकारचं पपई उत्पादक शेतकऱ्यांकडे होणाऱ्या दुर्लक्ष जिल्ह्यातून पपई नामशेष होण्यास कारणीभूत ठरू शकते.

Nandurbar Agriculture News in Marathi
Sanjay Raut: …तेव्हा हे सगळे बिळात लपले होते; राम मंदिरावरून संजय राऊतांचा हल्लाबोल, म्हणाले, इतिहास आणि भाजप...

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com