Accident News: लग्नाहून परतताना वऱ्हाडाच्या गाडीला भीषण अपघात, छत्रपती संभाजीनगर-अहमदनगर महामार्गावरील घटना

Vehicle Carrying Bridegroom Accident: छत्रपती संभाजीनगर अहमदनगर महामार्गावरील इसारवाडी येथे लग्नाच्या वऱ्हाडाचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ९ जण जखमी झाले आहेत.
Accident News
Accident NewsSaam Tv

रामनाथ ढाकणे

Accident On Sambhaji Nagar Ahmednagar Highway

छत्रपती संभाजीनगरमध्ये लग्नाचे वऱ्हाड नेणाऱ्या वाहनाचा अपघात झाला आहे. छत्रपती संभाजीनगर अहमदनगर महामार्गावरील इसारवाडी येथे ही घटना घडली आहे. या अपघातात नऊजण जखमी झाल्याची माहिती (Vehicle Carrying Bridegroom Accident) मिळतेय. (Accident News)

लग्न सोहळा आटोपून वऱ्हाडी गावी परतत होते. वऱ्हाडाला घेऊन जाणारी जीप आणि ऊस घेऊन जाणारी पिकअप यांच्यात मोठा अपघात झाला. या अपघातात नऊ प्रवासी गंभीर जखमी झाले (Accident News) आहेत. हा अपघात छत्रपती संभाजीनगर-अहमदनगर महामार्गावर ईसारवाडी फाट्याजवळ झाला आहे. गंभीर जखमी असलेल्या नऊ जणांना पुढील उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

वऱ्हाडाच्या गाडीचा भीषण अपघात

हा अपघात शनिवारी (१६ मार्च) सायंकाळी रोजी घडली ( Accident At Isarwadi) आहे. ही घटना शनिवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास छत्रपती संभाजीनगर नगर महामार्गावरील इसारवाडी फाटा येथे घडली. अपघातानंतर दोन्ही वाहनांची अवस्था अतिशय गंभीर झालेली आहे.

श्रीरामपूरहून विवाह समारंभ आटोपल्यानंतर गिरी व डांगे परिवार पैठण तालुक्यातील लोहगाव येथे परतत होते. याचवेळी उसाचे वाडे घेऊन जाणारी एक पिकअप छत्रपती संभाजीनगरहन नगरच्या दिशेने (Chhatrapati Sambhaji Nagar Ahmednagar Highway) जात होती. यावेळी वऱ्हाड घेऊन जाणारी जीप ईसारवाडी फाट्याकडे वळण घेत होती. तेव्हाच दोन्ही वाहनांचा जबरदस्त अपघात झाला.

Accident News
Accident News: भरधाव कारची ट्रॅकरला पाठीमागून जोरदार धडक; लग्नाहून परतणाऱ्या ८ जणांचा जागीच मृत्यू

अपघाताची नोंद

मोठा आवाज झाल्यामुळे परिसरातील नागरिकांनी वाहतूक थांबवली. त्यांनी जीपमधील जखमी प्रवाशांना बाहेर काढले. रुग्णवाहिकेतून अपघातात जखमी झालेल्या व्यक्तींना उपचारार्थ घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं (Bridegroom Accident) आहे. वाळूज पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली. या अपघाताची नोंद वाळूज पोलिसांनी केली आबे.

या अपघातामध्ये वैभव संदीप डांगे (१०), प्रतीक गजानन गिरी (१०), राजश्री गजानन गिरी (१२), (Latest Accident News) रेखा अर्जुन डांगे (१४) आकांक्षा गजानन गिरी, (१८), आशिष सुखदेव गिरी (२१), ऋतुजा आशिष गिरी (२०), अनिता संदीप डांगे (३०) आणि सिंधू गिरी (४४) जखमी झाले आहेत.

Accident News
Rajasthan Railway Accident : साबरमती-आग्रा सुपरफास्ट एक्सप्रेसचे 4 डबे घसरले; प्रशासन घटनास्थळी दाखल, बचावकार्य सुरु

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com