
बीड सरपंच हत्येप्रकरणी पुढे आलेलं वाल्मिक कराड हे नाव सध्या राज्यभरात चर्चेतंय. वाल्मिक कराड हा परळी तालुक्यातील पांगरी गावचा रहिवाशी. दहावीनंतर पुढील शिक्षणासाठी तो परळीत आला आणि परळीचा डॉन झाला. उपजिविकेसाठी त्यानं व्हिसीआर भाड्यानं दिला. तर कधी जत्रेत सिनेमे दाखवून पोटभरणाऱ्या वाल्मिकनं बीडचा मिर्झापूर करुन सोडला. गोपिनाथ मुंडेंच्या परमार कॉलनीत घरात वाल्मिक कराड घरगडी म्हणून दूध, भाजीपाला, किराणा आणण्याची कामं करु लागला.
वैद्यनाथ कॉलेजच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत वाल्मिकनं घातलेल्या गोंधळामुळे पोलिसांची गोळी वाल्मिकच्या पायाला लागली आणि गोपिनाथ मुंडेंसोबतच वाल्मिक हा मुंडे कुटुंबियाचा खास झाला. परळीच्या थर्मल प्लॅंटमध्ये लहानसहान कंत्राटे मिळवून वाल्मिकनं आपली घरगडी ही ओळख मिटवली.
मुंडे बंधूमधील वितुष्ट हे वाल्मिक साठी फायद्याचं ठरलं. पंडित अण्णा मुंडे आणि धनंजय मुंडेसोबत वाढवलेली जवळीक वाल्मिकला राजकारणात जम बसवायला महत्त्वाची ठरली. मुंडेंचा घरगडी वाल्मिक हा बीडचा वाल्मिक अण्णा म्हणून राजकारणात पुढे आला आणि अनेक पद मिळवू लागला. याच वाल्मिक कराडच्या राजकीय कारकिर्दीवर एक नजर टाकूया..
परळी नगर परिषदेचा माजी नगरसेवक
परळी नगर परिषदेचा उपनगराध्यक्ष आणि माजी गटनेता
नाथं प्रतिष्ठानचा सदस्य
बीड जिल्हा स्थायी समिती सदस्य
गेल्या 10 वर्षापासून परळी मतदारसंघातील धनंजय मुंडेंच्या राजकीय व्यवस्थापनाची जबाबदारी
धनुभाऊंचं ज्याच्याशिवाय पानही हलत नाही तो वाल्मिक कराड अशी वाल्मिकची पकंजा मुंडेंनी करुन दिलेली ओळख अनेकांना अचंबित करणारी ठरली. धनजंय मुंडेंच्या साथीनं उभारलेली संपत्ती आणि प्रतिष्ठा ही बीडच्या राजकारणात कायम चर्चिली जायची. आज वाल्मिक कराड संतोष देशमुख सरपंच हत्येच्या आरोपात मोस्ट वॉन्डेट आहे. त्याच्या कृत्यानं त्याच्यावर आणलेली ही वेळ आता बीडच्या राजकारणात काय भुकंप घडवते हे पहावं लागेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.