Dhanjay Munde: कृषी खातं साधंसुधं नाही, चांगलं झालं तरी लोकं कौतुकही करेना: धनजंय मुंडे

Agriculture Minister: पुण्यातील खेड-आळंदी विधानसभेत विकासकामांच्या लोकार्पण सोहळ्यात बोलतांना धनंजय मुंडे यांनी निवडणुकीच्या आधीच विजयाचा दावा केलाय.
Dhanjay Munde: कृषी खातं साधंसुधं नाही, चांगलं झालं तरी लोकं कौतुकही करेना: धनजंय मुंडे
Agriculture Minister
Published On

रोहिदास गडगे, साम प्रतिनिधी

राज्यात पाऊस कमी पडो की जास्त पडो अथवा विमा अन अनुदान उशिरा मिळो शिव्या या कृषी मंत्र्याला खाव्या लागतात. त्यामुळं मला रोज रात्री उचक्या येतात, असं वक्तव्य कृषिमंत्री धनंजय मुंडेंनी केलंय. कृषी खातं हे साधंसुधं नाही, हे सांगताना चांगलं झालं तर लोक साधं कौतुक ही करत नाहीत. पण वाईट झालं की शिव्यांची लाखोळी वाहतात. मुंडे असं म्हणताच सभागृहात एकच हशा पिकला. पुण्यातील खेड-आळंदी विधानसभेत विकासकामांच्या लोकार्पण सोहळ्यात मुंडे बोलत होते.

Dhanjay Munde: कृषी खातं साधंसुधं नाही, चांगलं झालं तरी लोकं कौतुकही करेना: धनजंय मुंडे
Maharashtra Politics: ...म्हणून लक्ष्मण पवारांची निवडणुकीतून माघार, धनंजय मुंडे यांचा पलटवार

तुम्ही कशाला कृषिमंत्री झालात. असं मला इन्शुरन्स कंपन्या म्हणतात, मुंडे म्हणाले. शेतकऱ्यांना किती ही दिलं तरी ते कमीचं आहे.कारण शेतकरी खुल्या आकाशाखाली शेती करत असतो, अनेक समस्यांना सामोरे जात असतात, असं धनंजय मुंडे म्हणाले.

सत्ता आमचीच येणार पण..

याबरोबर लाडकी बहीण योजनेवर टीका करणाऱ्या विरोधकांवरही मुंडे यांनी तोंड सुख घेतलं. काहीही झालं तरी आणि कोणी कितीही उड्या मारल्या तरी सत्ता आमचीच येणार. कारण लाडक्या बहिणी आणि लाडका शेतकरी आमच्यासोबत आहेत, त्यामुळे सत्ता आमचीच राहणार आहे. पण पुढच्यावेळी हेच खातं माझ्याकडे असावं यासाठी आमदार दिलीप मोहितेंनी पाठपुरावा करावा, अशी साद ही मुंडेंनी यावेळी घातली आहे.

यावेळी बोलातांना कृषिमंत्री होणं सोपं नाही आपल्याला रोज रात्री उचक्या लागतात. कारण मला रोज शिव्या दिल्या जातात. पाऊस कमी झाला किंवा जास्त झाला, किंवा विम्याचे पैसे मिळाले नाहीत तर शेतकरी शिव्या घालतात.परंतु हे स्वाभाविक आहे, हे शेतकरी कबाड कष्ट करत असतो. जेव्हा निसर्ग कोपतो तेव्हा शेतकरी अडचणीत सापडत असतात. त्यावेळी ते आपला राग व्यक्त करत असतात, असं धनंजय मुंडे म्हणालेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com