कॉलेज विद्यार्थ्यांसाठी लसीकरण मोहीम, उदय सामंत यांची माहिती
कॉलेज विद्यार्थ्यांसाठी लसीकरण मोहीम, उदय सामंत यांची माहितीSaam Tv

कॉलेज विद्यार्थ्यांसाठी लसीकरण मोहीम, उदय सामंत यांची माहिती

विद्यार्थ्यांशी संवाद साधताना ऑनलाईन - ऑफलाईन परीक्षा, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, कोरोनानंतरच्या काळातील नोकरीच्या संधी यासह अनेक विषयांवर उदय सामंत यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
Published on

मुंबई - कोरोनच्या पार्श्वभूमीवर गेल्या दीड वर्षपेक्षा जास्त काळ महाविद्यालये ऑनलाईन पद्धतीने सुरू होती. पण आता आता कोरोचा प्रादुर्भाव कमी झाल्याने महाविद्यालये ऑफलाइन पद्धतीने सुरू करण्यात आली आहेत. कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस झालेले विद्यार्थी ऑफलाईन उपस्थित राहू शकणार आहेत. त्यासाठी येत्या २५ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर दरम्यान व्यापक लसीकरण मोहीम राबविणार असल्याची माहिती राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना ऑनलाईन - ऑफलाईन परीक्षा, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, कोरोनानंतरच्या काळातील नोकरीच्या संधी यासह अनेक विषयांवर उदय सामंत यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

हे देखील पहा -

सामंत म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आरोग्य विभागासोबत बैठक घेऊन, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या लसीकरणासाठी व्यापक मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेतून प्रत्येक महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्याला लस उपलब्ध होईल करून देण्यात येणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी लसीचे दोन डोस घेतले आहेत त्यांनी देखील सामाजिक अंतर राखून तसेच मास्कचा वापर वर्गात उपस्थिती लावावी. प्रत्येक वर्गात जाऊन विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी काय तयारी महाविद्यालयांनी केली आहे याची पाहणी सामंत यांनी केली आणि आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना देखील यावेळी दिल्या.

कॉलेज विद्यार्थ्यांसाठी लसीकरण मोहीम, उदय सामंत यांची माहिती
राज्यातील वनांमध्ये बेसुमार अवैध वृक्षतोड; चार वर्षात 2 लाख 66 वृक्षतोड

महाविद्यालये सुरू झाली असली तरी विद्यार्थ्यांना लोकल ट्रेनने प्रवास करण्यात अडचणींचा सामना करावा लागत आहे. मात्र यासंदर्भात राज्याच्या मुख्य सचिवांशी चर्चा झाली आहे. जे विद्यार्थी महाविद्यालयासाठी प्रवास करत आहेत त्यांना लसीकरण प्रमाणपत्र दाखवल्यावर तिकीट द्यावे, अशी मागणी करणारे पत्र मुख्य सचिवांना दिले आहेत. ही समस्या येत्या २ ते ३ दिवसात मार्गी लागणार असल्याचे आश्वासन सामंत यांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिले.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com