नागपूर - एकीकडे राज्यात वृक्षारोपणाच्या मोठमोठ्या मोहिमा आणि त्याच्या प्रसिद्धी होत असताना दुसरीकडे वृक्षांची बेमुसार कत्तल होत आहे. गेल्या चार वर्षात राज्यातील वनांमध्ये तब्बल 2 लाख 66 हजार 322 वृक्षांची कत्तल करण्यात आल्याचे धक्कादायक वास्तव माहितीच्या अधिकारात पुढे आले आहे. राज्यातील वनांमध्ये लाकुडतस्कर सक्रिय आहे आणि लाकुडतस्करांना विभागाचा आशीर्वाद असल्याचे दिसून येत आहे.
हे देखील पहा -
राज्यातील वनांमध्ये सागवानचे वृक्ष मोठ्या प्रमाणात आहेत. सागवानला बाजारात मोठी मागणी आणि किंमत आहे. त्यामुळे लाकुडतस्कर या सागवान साठी मोठ्या प्रमाणात अवैध कत्तल करतात. चार वर्षातील अवैध वृक्षतोडीमुळे वनविभागाला 20 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. मात्र, या नुकसानीपेक्षा वानांमधील वृक्षांची संख्या कमी होत असल्याने निसर्गाचं संतुलन बिघडत चाललं आहे, हे धोकादायक आहे.
Edited By - Shivani Tichkule
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.